शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विद्यार्थ्यांचे ‘गणित’ गडबडले : मराठीने देखील मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 20:52 IST

मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात नागपूर विभागाने तळ गाठला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, इंग्रजीने मदतीचा हात दिला असला तरी मराठी व गणिताने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. मराठीचा निकाल ८६.६८ टक्के तर गणिताचा निकाल ८६.६९ टक्के लागला.

ठळक मुद्देनागपूर विभागात १२ विषयांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात नागपूर विभागाने तळ गाठला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, इंग्रजीने मदतीचा हात दिला असला तरी मराठी व गणिताने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. मराठीचा निकाल ८६.६८ टक्के तर गणिताचा निकाल ८६.६९ टक्के लागला. संपूर्ण विभागात १२ विषयांचा निकाल हा ‘सेंट परसेंट’ लागला आहे.विद्यार्थ्यांना ‘कीलर’ विषय वाटत असलेल्या इंग्रजीचा निकाल तुलनेने चांगला लागला आहे. इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.२० टक्के तर इंग्रजी (द्वितीय भाषा) विषयाचा निकाल ८७.७५ टक्के लागला आहे. इंग्रजीबद्दलची विद्यार्थ्यांमधील भीती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषेचा निकाल कमी लागला आहे. मराठीचा (प्रथम भाषा) निकाल ८६.६८ टक्के लागला आहे. तर मराठी (द्वितीय-तृतीय भाषा)चा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. सुमारे ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामान्य गणिताचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७४.९७ टक्के लागला आहे.संस्कृतने यंदादेखील विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी मोलाचा हात दिला आहे. संस्कृतचा विभागातील निकाल ९९.१५ टक्केलागला आहे. १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात तेलगू, कन्नड, पाली, बंगाली, तामीळ इत्यादी विषयांचा समावेश आहे.विज्ञानाने तारलेभाषा व विज्ञान अभ्यासक्रमांचे निकाल यंदादेखील चांगले लागले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९३.४० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर सामाजिक विज्ञान विषयात ९५.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कन्नडला अवघा एकच विद्यार्थीसर्वात जास्त १ लाख ७२ हजार ९१८ विद्यार्थी गणिताच्या परीक्षेला बसले. तर त्याखालोखाल १ लाख ७२ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाची परीक्षा दिली. कन्नडच्या विषयाला अवघा एकच परीक्षार्थी होता व तो उत्तीर्ण झाला. ११ विषयांमध्ये १०० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते.प्रमुख विषयांची टक्केवारीविषय टक्केमराठी (प्रथम) ८६.६८मराठी (द्वितीय-तृतीय) ९३.०१हिंदी (प्रथम) ८८.९४हिंदी (द्वितीय-तृतीय) ८९.१२इंग्रजी(प्रथम) ९९.२०इंग्रजी(द्वितीय-तृतीय) ८७.७५गणित ८६.६९विज्ञान ९३.४०सामाजिक विज्ञान ९५.३८संस्कृत ९९.१५१०० टक्के निकाल लागलेले विषय-तेलगू (प्रथम)-बंगाली (प्रथम)-कन्नड (द्वितीय / तृतीय)-पाली (द्वितीय / तृतीय)-फिजिआॅलॉजी हायजिन अ‍ॅन्ड होम सायन्स-टुरिझम अ‍ॅन्ड ट्रॅव्हल-अ‍ॅग्रीकल्चर-बॅकिंग अ‍ॅन्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस-हिंदी-जर्मन (द्वितीय / तृतीय)-हिंदी-तामीळ (द्वितीय / तृतीय)-हिंदी-सिंधी (द्वितीय / तृतीय)-इन्ट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी (द्वितीय / तृतीय)

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर