शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील शालेय विद्यार्थी खिचडीच्या जागी खाताहेत नुसताच पांढरा भात ; पुरवठादाराने बंद केला पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 19:52 IST

शालेय पोषण आहार पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पांढऱ्या भातावरच पोषण सुरू आहे. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, तर राज्यभरात पोषण आहाराची अशीच अवस्था आहे.

ठळक मुद्देपोषण आहाराचा तिढा सुटणार कधी?

आॅनलाईन लोकमतनागपूर : शालेय पोषण आहार पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ही जबाबदारी शिक्षकांवर ढकलली. मात्र शिक्षकांनी या जबाबदारीतून हात काढल्याने सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पांढऱ्या भातावरच पोषण सुरू आहे. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, तर राज्यभरात पोषण आहाराची अशीच अवस्था आहे.पोषण आहाराच्या रूपात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. यासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड या पुरवठादारामार्फत पुरविण्यात येत होते. शासनाने या पुरवठादार कंपनीशी करार केला होता. हा करार जून २०१६ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर कंपनीला एक महिन्याची वाढ देण्यात आली. दरम्यान एक महिन्यात शासनाने पुरवठादारासंदर्भात कुठलीही प्रक्रिया न केल्याने आॅगस्टपासून पुरवठादाराने खिचडीसाठी लागणारा धान्यादी मालाचा पुरवठा बंद केला. धान्यादी मालात मटकी, तूरडाळ, वाटाणा, मसाले, तेल, मीठ, तिखट आदींचा समावेश आहे. हे साहित्य आॅगस्ट महिन्यापासून शाळांना पुरवठा झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना खिचडी शिजविण्याबरोबरच धान्यादी मालाच्या खरेदीचीही जबाबदारी दिली होती.शासनाने पुरवठादाराशी केलेल्या समन्वयातून शाळांना केवळ तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र धान्यादी माल हा मुख्याध्यापकाने खरेदी करावा, अशा सूचना शिक्षण विभागाच्या होत्या. इंधन व भाजीपाल्याबरोबरच मुख्याध्यापकांना धान्यादी मालही खरेदी करायचा होता. मुख्याध्यापकांनी महिनाभर हा खर्च केला, परंतु विभागाकडून त्याकरिता निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही. पोषण आहाराच्या खर्चाचा भुर्दंड वाढल्याने मुख्याध्यापकांनी धान्यादी मालाच्या खरेदीला विरोध केला. याविरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनानी एकत्र येऊन नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारले व ३ आॅक्टोबरपासून धान्यादी मालाची खरेदी न करता उपलब्ध धान्य शिजवून देण्याचे ठरवण्यात आले. शिक्षण विभागाने तडजोड करून आॅगस्ट आणि सप्टेंबरचा खर्च दिला. परंतु आॅक्टोबरपासून पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. अनेक शाळांमध्ये धान्यादी मालाची खरेदी करण्यात आली नसल्याने पांढरा भातच विद्यार्थ्यांना दिला जात आहे.शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु पाच महिने लोटूनही शासनाने ते गांभीर्याने घेतले नाही. परिणामी आज गरीब विद्यार्थ्यांना पांढरा भात खाण्याशिवाय पर्याय नाही.लीलाधार ठाकरे, अध्यक्ष, नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समिती

टॅग्स :educationशैक्षणिक