शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

विद्यार्थी राजकारणाचे केंद्र जमीनदोस्त होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 9:12 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात येणार असून तेथे विद्यापीठाकडून ‘पार्किंग’साठी दुमजली इमारतीसह नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा बुटी सभागृहाच्या जागेवर दुमजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव : ‘पार्किंग’साठी इमारत उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पूर्णचंद्र बुटी सभागृहाचे वेगळेच महत्त्व आहे. विद्यार्थी राजकारण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या इमारतीने विद्यापीठातील अनेक बदल पाहिले आहे. मात्र आता ही इमारत पाडण्यात येणार असून तेथे विद्यापीठाकडून ‘पार्किंग’साठी दुमजली इमारतीसह नवीन सभागृह बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालय परिसरात पूर्णचंद्र बुटी सभागृह आहे. १९६८ साली हे सभागृह बांधण्यात आले होते. विद्यार्थी निवडणुकांच्या काळात या हे सभागृह राजकारणाचे केंद्र होते. याच इमारतीत विद्यार्थी परिषदेचे कार्यालयदेखील आहे. सोबतच येथे विद्यापीठातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते.मात्र ही इमारत जुनी झाली असून याला काही वर्षांपूर्वी नवीन रुप देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु इमारतीच्या स्थापत्य तसेच विद्युतसंबंधी परीक्षण व दुरुस्तीच्या कामावर वारंवार खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ही इमारत पाडून येथे अद्ययावत दोन मजली इमारत व त्याच्यावर सभागृह बांधण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला येणार होता. मात्र सर्व मुद्द्यांवर चर्चा न होऊ शकल्याने हा विषय गुरुवारी होणाºया बैठकीत चर्चेला येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मेट्रो’साठी द्राविडी प्राणायामसूत्रांनी दिलेली माहिती धक्कादायकच आहे. बुटी सभागृहाच्या बाजूला विद्यापीठ ग्रंथालय आहे. ग्रंथालयाच्या समोरील बाजूने ‘मेट्रो’ जाणार आहे. ‘मेट्रो कॉरिडॉर’मध्ये भूखंड सीमेपासून दोन्ही मार्गाच्या बाजूने ३ मीटरची जागा फूटपाथसाठी सोडावी लागेल. त्यामुळे या परिसरातील खुली जागा व पार्किंगचे क्षेत्र कमी होईल. यासाठी या पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी दुमजली ‘पार्किंग’ची व्यवस्था असलेली इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत अद्ययावत असेल असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. मात्र नागपूर ‘मेट्रो’च्या मार्गावर शहरभरात अशा अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. अनेक इमारतींची काही जागा ‘मेट्रो’साठी सोडावी लागणार आहे. जर त्या इमारतींना पाडण्यात येत नसेल तर मग नागपूर विद्यापीठाकडूनच हा द्राविडी प्राणायाम का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पार्किंग’साठी अशी लागतेच किती जागा ?ग्रंथालयामध्ये साधारणत: विद्यार्थ्यांच्या दुचाकीचे ‘पार्किंग’ होते. ‘मेट्रो’मुळे तीन मीटरची जागा जाणार असली तरी ग्रंथालय परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ‘पार्किंग’ची समस्या निर्माण होण्याची फारशी शक्यता नाही. शिवाय परिसरातील इतर विभागांतदेखील ‘पार्किंग’साठी जागा आहेच. मग ‘पार्किंग’च्या नावाखाली बुटी सभागृह पाडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न व्यवस्थापन परिषदेतील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोParkingपार्किंग