शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पिवळी नदीत विद्यार्थी वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:02 IST

वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देवनदेवीनगरात घटना : परिसरात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.दोन दिवसांपासून शहरात संततधार पाणी सुरू असल्यामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. पिवळी नदीलाही पूर आला आहे. पिवळी नदीच्या काठावर राहणाऱ्या गरीब परिवारातील मुले पाण्यात वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू काढण्याच्या नादात काठावर उभे होते.दुपारी १२ च्या सुमारास अदनान त्याच्या साथीदारांसह वनदेवीनगरातील नदीजवळ खेळत होता. त्याला पाण्यात प्लास्टिकचा बॉल वाहत येत असल्याचे दिसले. तो काढण्याच्या नादात तो काठावर गेला. चिखलामुळे पाय घसरल्याने अदनान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ते पाहून त्याच्यासोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली. ती ऐकून शेजारचे लोक धावले. मात्र, वेगवान प्रवाहामुळे अदनान वाहून गेला. या घटनेची माहिती कळताच यशोधरानगर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कळमना परिसरापर्यंत शोधाशोध केली, मात्र अदनान सापडला नाही.अदनानचा परिवार गरीब आहे. त्याला आई मर्जिना कुरेशी, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मर्जिना मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा रेटतात. या घटनेमुळे अदनानच्या परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे. परिसरातही शोककळा पसरली आहे. अदनानच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू