---------------
बिडी पेटविताना जळून मृत्यू
नागपूर : बिडी पेटविताना स्वत:च जळालेल्या युवकाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संदीप रमेश गणवीर (३८) असे मयताचे नाव असून, तो पडोळेनगर येथील रहिवासी होता. ही घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. संदीप घरामध्ये काही वस्तू शोधत असताना त्याच्या अंगावर तारपिन पडले. त्यानंतर तो बिडी पिण्यासाठी घरातून बाहेर आला. दरम्यान, त्याने बिडी पेटविण्यासाठी आगकाडी जाळली असता त्याच्या अंगावरील कपड्याने आग पकडली. त्यामुळे तो गंभीररीत्या जळाला. त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
------------
तीन अल्पवयीन मुले सुधारगृहातून पळाली
नागपूर : कोराडी येथील बाल सुधारगृहातील तीन अल्पवयीन मुले पळून गेली. मुले १४ ते १६ वर्षे वयाची आहेत. ते बुधवारी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास खिडकीचे रॉड काढून पळून गेले. कोराडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. मुलांचा शोध घेतला जात आहे.