शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

धडपड वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी!

By admin | Updated: December 21, 2014 00:15 IST

सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते.

लढा अंगणवाडीच्या विकासासाठी : जि.प.च्या माजी अध्यक्षाची संघर्षकथासुमेध वाघमारे - नागपूरसरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते. अंगणवाडी सेविका म्हणून तुटपुंज्या वेतनात आपले घर चालविते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटाव्यात एवढीच तिची मागणी आहे. किसनाबाई भानारकर त्या महिलेचे नाव. भंडारा जिल्ह्यातील, पवनी तहसीलमधील कन्हाळा येथे राहणाऱ्या किसनाबाई शुक्रवारी अंगणवाडीच्या निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करणे, बालकांमधले मृत्यू, आजार, कुपोषण कमी करणे आणि यामुळे होणारी शैक्षणिक गळती थांबवणे. आई आणि कुटुंबाचे बालसंगोपनाचे कौशल्य वाढवणे ही उद्दिष्ट ठरवून किसनाबाई काम करीत आहे. त्यांना बोलते केले असता त्या म्हणाला, अंगणवाडी म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. याच आधारावर मला लोकांनी १९९५ मध्ये कन्हाळा गावाचे सरपंच केले. १९९७ मध्ये समाजकल्याण सभापती झाले आणि १९९८ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. यादरम्यान अनेक विकास कामांच्या कोट्यावधींच्या फाईलवर स्वाक्षरी केल्या. लाल दिव्याच्या गाडीतून चंद्रमोळीच्या झोपडीत शिरताना कधीही लाज वाटली नाही. त्यावेळीही चटणी भाकर खात होती आजही खाते. नशिबाने जेवढं भरभरून दिले तेवढंच हिसकावूनही घेतल. १९८६ मध्ये पती गेले. २०१०मध्ये दोन्ही मुले पुरात वाहून गेली. आज मी एकटी असलीतरी अंगणवाडीतील असंख्य मुले माझ्यासोबत आहे. आता तेच माझे कुटुंब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मी स्वत: अनुभवत आहे. त्या म्हणाल्या, कुपोषण हटवणे ही सोपी गोष्ट नाही. ही लढाई समाजाने अंगणवाडीवर सोपवून समस्या सुटणार नाही. अंगणवाडी केवळ यासाठी मदत करते. अंगणवाडी सेवांमध्येही अनेक अडचणी असल्याने शासनाने त्या सोडवाव्यात एवढीच मागणी आहे. (प्रतिनिधी)