शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

संघर्षाची फलश्रुती

By admin | Updated: January 26, 2015 01:03 IST

भंडारा जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाही घराच्या मोबदल्यावर व्याज मिळावे यासाठी चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची यशस्वी फलश्रुती झाली असून शासनाने

गोसेखुर्द : प्रकल्पग्रस्तांना मिळणार व्याजाची रक्कम नागपूर: भंडारा जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाही घराच्या मोबदल्यावर व्याज मिळावे यासाठी चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची यशस्वी फलश्रुती झाली असून शासनाने व्याजापोटी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.गोसेखुर्द प्रकल्पात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरापोटी शासनाने मोबदला जाहीर केला होता. तो देण्यास विलंब झाल्याने त्यावर व्याज देण्यात आले.पण ही रक्कम फक्त भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाच मिळाली होती. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त त्यापासून वंचित होते. त्यामुळे भंडाऱ्याप्रमाणेच आम्हालाही ही रक्कम मिळावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची होती. संघर्ष समितीचा लढा चार वर्षांपासून सुरू होता. मधल्या काळात भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांकडून व्याजाची रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याला कडाडून विरोध झाल्याने तो बारगळला. तत्कालीन विभागीय आयुक्त वेणूगोपाल रेड्डी व विद्यमान आयुक्त अनुपकुमार यांच्यासोबत चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा नागपूरच्या प्रकल्पग्रस्तांनाही व्याजाची रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनानेही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवशना दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर शासनाने व्याजापोटी १३ कोटी ६७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात वळता केला जाणार आहे.दरम्यान यासंदर्भात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजत विलास भोंगाडे यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे सांगितले. प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने न्याय मिळाला, असे त्यांनी स्पष्ट केले.( प्रतिनिधी)