शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी मूर्ती विक्रत्यांविरोधात कडक कारवाई : महापौरांनी बैठकीत दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:16 IST

महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देगणेशोत्सवाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.या बैठकीला आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, रूपा रॉय, सुनील अग्रवाल, अपर आयुक्त राम जोशी, अजीज शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी, सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.यासंदर्भात यंत्रणेला निर्देश देताना महापौर म्हणाल्या, पीओपीच्या मूर्तींवर विक्रेत्यांनी लाल रंगाची खूण करणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. मागील वर्षी ज्याप्रकारे सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा, अंबाझरी तलावामध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन झाले नाही तशीच सतर्कता यावर्षी नाईक तलावाच्याबाबतीत पाळा. पीओपी मूर्तींचेविसर्जन कृत्रिम तलावातच होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नागरिकांनाही त्यासाठी आवाहन करावे. शहरातील भागांमध्ये कृत्रिम टँक लावले जावेत, अशीही सूचना त्यांनी केली.वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, गणेश विसर्जनासाठी रबरी टँकचा वापर केला जातो. मात्र ते काही दिवसातच खराब होतात. दरवर्षी नवीन खरेदी करावी लागते. त्यामुळे रबरी टाक्यांएवजी सेंट्रिंगचे टाके तयार करण्यात यावेत. विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणावर उजेडाची व्यवस्था केली जावी. उत्सवाच्या आधीच विसर्जन मार्ग दुरुस्त करण्याचे काम हाती घ्यावे, कृत्रिम टाक्यांच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्ताव तयार करावे, अशी सूचना त्यांनी मांडली.वर्ष       कृत्रिम तलाव      निर्माल्य      मूर्तीं विसर्जन२०१६      २००                   १४७            १,७८,७०१२०१७      २३४                   १५२            २,०७,०११२०१८       २६०                   १६३            २,३१,५०१विसर्जनासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदीपाण्याची समस्या लक्षात घेता विविध संघटनांनी पिण्याच्या पाण्याचा उपयोग विसर्जनासाठी करण्यास मनाई करण्याची सूचना मांडली. ही मागणी महापौरांनी मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विसर्जनादरम्यान संकलित होणारे निर्माल्य सुगंधित अगरबत्ती तयार करणाऱ्यांना नि:शुल्क देण्याची सूचना केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका