शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वीज कर्मचारी संपावर, कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:31 IST

वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देकामगार संघटनांचा ८० टक्के कर्मचारी-अधिकारी संपावर असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८० टक्के कर्मचारी, अधिकारी अभियंते सहभागी असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. परंतु वीज प्रशासनाने मात्र संपाचा कुठलाही परिणाम पडला नसल्याचे स्पष्ट केले. ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी कामावर असल्याचे स्पष्ट केले.राज्यव्यापी संपाअंतर्गत सोमवारी सकाळी नागपूर शहरातील कर्मचारी, इंजिनियर्स काटोल रोडवरील प्रादेशिक संचालकांच्या कार्यालयासमोर एकत्र आले. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटन, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार युनियनशी संबंधित कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेटसमोर सभा घेतली. यामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. या सभेला कर्मचारी नेते कॉ.मोहन शर्मा, सी.एम. मौर्य, पी. वी. नायडू, श्रीमती अमृते, शंकर पहाडे, सुनील बोशे, रवि बराई व रवी वैद्य यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शासनाची धोरणे कामगारविरोधी आहेत. त्यांनी वीज कंपन्यांच्या पुनर्रचनेचा विरोध केला. तसेच मुंब्रा, शील, कळवा व मालेगाव हे विभाग खासगी भांडवलदार कंपन्यांना देण्याचा विरोध केला. महाजेनकोची लघुजलविद्युत योजना सरकारला हस्तांतरित करणे, २१० मेगावॅटपर्यंतचे वीज केंद्र बंद करणे आणि आऊटसोर्सिंगच्या विरुद्ध आवाज बुलंद केला. संघटनांनी पेन्शन योजना लागू करणे आणि बदलीचे धोरण तयार करण्याची मागणी केली.या संपाचा थोडाफार परिणाम महावितरणमध्ये दिसून आला. परंतु कुठेही वीज पुरवठा प्रभावित झाल्याचे वृत्त नाही. महाजेनकोच्या कोराडी व खापरखेडा वीज केंद्रातील उत्पादन प्रभावीत झाले नाही. माजी आमदार आशिष देशमुख आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विद्युत भवन येथे येऊन संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.वीज सेवा सुरळीतदुसरीकडे महावितरणने स्पष्ट केले की, संपामुळे वीज सेवेवर कुठलाही परिणाम पडलेला नाही. वीज सेवा सुरळीत सुरू होती. ५० टक्के कर्मचारीही संपात सहभागी झाले नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कुठलेही पद कमी करण्यात येणार नाही. कामगार संघटनांशी चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील रस्तापेठ व गणेशखिंड मंडळ, भांडुप येथील वाशी व ठाणे मंडळ, तसेच कल्याण मंडळात याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या उणिवा व त्रुटी दूर करण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ग्राहक व कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुनर्रचना निश्चित केली जाईल. याचा उद्देश कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करणे हा आहे. कंपनीने सांगितले की, फ्रेन्चाईसीकरणाचे धोरण कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊनच मंजूर करण्यात आलेले आहे.

 

 

 

 

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप