शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:06 IST

शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी आणि मनुष्यहानीचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असल्याने मागील काही महिन्यांत अनेक वन्यप्राणी आणि मनुष्यहानी झाली आहे. शिवाय अशाप्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेत शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरात शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने गणपत उकुंडे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यापूर्वी १७ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील गिरोला रिठी येथे दोन रानगवे आणि त्यांच्या दोन पिल्लांचाही शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.विदर्भातील वन परिक्षेत्रालगतच्या परिसरातील शेतातील पिकाच्या रक्षणासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असली तरी यामुळे होणारे प्राणांकित अपघात सर्वस्वी चिंतेचा विषय आहे. २३ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतर्गत वलमाझरी जंगल शिवारात रानगव्याची शिकार याचप्रकारे करण्यात आली होती, तर २३ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार येथे शेती कुंपणातील विजेच्या धक्क्याने रानगव्याचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांसोबतच याचा फटका सामान्य जनतेलाही बसत असून, ८ जुलै रोजी वर्धा जिल्ह्यातील बाळापूर येथे रामराव टिपले या शेतकऱ्याचा मृत्यूही शेतीकुंपणातील विजेच्या धक्क्याने झाला आहे. तर मागील वर्षी १७ आॅक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहिरी येथे एका वाघिणीचाही मृत्यू अशाच प्रकारे विजेच्या धक्क्याने झाला होता. याप्रकरणात संबंधित शेतमालकाला अटक झालेली असून, ३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात तर ७ नोव्हेंबर रोजी चिमूर येथेही शेतीच्या कुंपणातील विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळले होते.७ वर्षांची तरतूदशेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करणे म्हणजे वीजेचा अवैध वापर असून याकरिता भारतीय विद्युत कायदयात शिक्षेची तरतूद आहे, मनुष्यहानी झाल्यास सदोष मणुष्यवध किंवा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा भारतिय दंड संहितेच्या कलम ३०४ आणि इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून एखाद्या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून यात ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. सोबतच अश्या प्रकारे शेती कुंपणात वीज प्रावाहित करणाऱ्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याचीही तरतुद असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वीजेचा अवैध वापर टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज