शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करावा : डॉ. भोंडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 21:59 IST

डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वैद्यकीय व्यवसाय हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे आणि तो खूप प्रतिष्ठित मानला जात आहे, परंतु आज सर्वांकडून डॉक्टरांवर टीका केली जात आहे. आज डॉक्टरांची प्रतिमा खराब केली जात आहे. अलीकडच्या काळात डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.डॉ. भोंडवे म्हणाले, लोकमतसारख्या मोठ्या माध्यम समूहाने हा पुरस्कार सुरू केल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. लोकमतने डॉक्टरांच्या कार्याला वेळोवेळी पाठिंबा दर्शविला आहे आणि नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले. लोकमत समूहाने विविध उपक्रम आणि आरोग्यसेवा कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यास नेहमीच मदत केली आहे. या पुरस्काराने सर्व आरोग्य व्यावसायिकांना तसेच डॉक्टरांना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि समूहाद्वारे नियोजित कोणत्याही आरोग्यविषयक उपक्रमांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) लोकमत समूहाबरोबर कायमच उभे राहील, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना मान्यता देण्याव्यतिरिक्त लोकमत समूहाने कर्करोग जागरूकता, स्तनाचा कर्करोग जागरूकता, हृदय जागरूकता आणि सर्वांगीण आरोग्यासारख्या विविध गोष्टींवर जनजागृती करण्यात गुंतलेल्या आरोग्य सेवा व्यावसायिकांकडेही पाहिले पाहिजे. अशा प्रकारच्या उपक्रमात लोकमत समूहासोबत भागीदारी करण्यात आयएमएला आनंद होईल. पुढील वर्षापासून या वर्गवारी अंतर्गत पुरस्कार देखील देण्यात यावा, असेही ते म्हणाले.डॉ. भोंडवे म्हणाले की, लोकमत टाइम्स हेल्थकेअर इन एक्सलन्स अवॉर्ड-२०२० सर्व आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय बंधूचे मनोबल वाढविण्यासाठी निश्चितच प्रगती करेल आणि मला विश्वास आहे की, भविष्यातही समूह असे करीत राहील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटdoctorडॉक्टर