शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार करणा-या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:06 IST

शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणा-या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली.

नागपूर : शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणा-या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. अनुदानास पात्र असलेल्या राज्यातील शाळेसंदर्भात डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी उत्तर देताना तावडेंनी ही घोषणा केली. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या सुमारे दोन हजार विनाअनुदानित शाळांपैकी पात्र शाळांना सरसकट २० टक्के अनुदान वितरित करण्यात आले. १ व २ जुलै २०१६च्या शासन निर्देशानुसार शाळा, वर्गतुकड्या व अनुदानास पात्र शाळांची यादी घोषित करणे अपेक्षित होते. मात्र शासनाने ही यादी का घोषित केलेली नाही, असा प्रश्न श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न निकाली काढण्याची शासनाची मानसिकता आहे. मात्र यादी घोषित केली तर शिक्षण संस्थाचालक शिक्षकांकडून पैसे मागतील, असे शिक्षक आमदारांनीच मला सांगितले आहे. 

गाणारांनी टोचले शासनाचे कानशिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्यासंदर्भातील प्रश्न नागो गाणार, अनिल सोले, गिरीश व्यास यांनी उपस्थित केला होता. नागो गाणार यांनी शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ पाच वर्षे आमदार असणा-या व्यक्तीला ४० हजारांची ‘पेन्शन’ मिळते, मात्र ५८ वर्षांपर्यंत सेवा देणा-या शिक्षकांना ‘पेन्शन’साठी झगडावे लागते हे दुर्दैव आहे.भविष्य निर्वाह निधी थांबविल्यानंतर ८०० शिक्षक न्यायालयात गेले होते. यातील केवळ २२८ जणांचेच भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्यात आले. इतरांबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरदेखील अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७