शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दैनिक संकलनाचे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:19 IST

ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत.सहकार विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ८९ सहकारी पतसंस्था आहेत. यातील अनेक पतसंस्था बऱ्याच जुन्या असून सहकार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. नागपूर शहरामध्ये सुमारे अडीच ते ३ हजार दैनिक संकलक आहेत. ते खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम गोळा करून संबंधिताच्या खात्यामध्ये बचत स्वरूपात जमा करतात. यातील बहुतेक खातेदार हातठेलाचालक, फूटपाथ व्यावसायिक तसेच गरीब वर्गातील आहेत. हे प्रतिनिधी घरपोच सेवा देत असल्याने या वर्गाला बचतीची सवय लागली आहे. या माध्यमातून अनेकांना पतसंस्थांचे कर्जही उपलब्ध झाले आहे.या दैनिक संकलनातून प्रतिनिधींना ठराविक कमिशन मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून झालेल्या कर्जपुरवठ्याच्या वसुलीचेही कमिशन मिळते. एक संकलक पाच ते सहा तासात साधारणत: २० ते ३० हजार रुपयांचे कलेक्शन करतो. त्यावरील कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार बंद असल्याने संबंधित खातेदारांना दैनिक ठेव जमा करणे तसेच घेतलेल्या कर्जाचा परतावा करणेही अशक्य झाले आहे. यामुळे संकलकांसोबतच पतसंस्थाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.राखीव निधीतून २५ टक्के द्यादैनिक संकलकांना काम सुरू करताना संबंधित पतसंस्थांकडे अमानत रक्कम जमा करावी लागते. राखीव निधी या हेडखाली ही ५ टक्के रक्कम पतसंस्थाकडे जमा असते. ही ठेव संकलकाच्या व्यवसायावर अवलंबून असते. अनेकांच्या ठेवी जवळपास ५ लाखांपर्यंतही पोहचल्या आहेत. या संकटाच्या काळात राखीव निधीतून २५ टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी संकलकांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.मागील तीन महिन्यांपासून वसुली ठप्प असल्याने पतसंस्थांच्या व्यवसायावर तसेच आम्हा संकलकांवरही प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे तसेच, राखीव निधीमधून २५ टक्के रक्कम परत केली जावी.धर्मेंद्र कारेमोरे, दैनिक संकलक

टॅग्स :MONEYपैसाnagpurनागपूर