शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना प्रादुर्भावाचा धोकाही वाढला : नागरिकांमध्ये संताप, कडक कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:20 IST

एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे आली आहे.नागपुरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाबधितांची संख्या सारखी वाढत आहे. बुधवारी अचानक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने उपराजधानीकर अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. लॉकडाऊन संपल्यासारखे आणि कोणताच धोका नसल्यासारखे वाहनचालक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पोलिसांकडून दंड्यांचा प्रसाद देणे कमी झाल्यामुळे आणि कोणतीही चौकशी न करता किंवा अडवले जात नसल्याने रिकामटेकडे मंडळी चांगलीच निर्ढावली आहे. ज्यांना अत्यावश्यक काम आहे, अशातील मंडळी कमी आणि कोणतेही काम नसताना रस्त्यावर फिरणारे रिकामटेकडे जास्त आहेत.या रिकामटेकड्यांच्या फेरफटक्यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका आणखीनच जास्त वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी आणि विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढविणाऱ्या रिकामटेकड्यांना धडा शिकवावा, अशी मागणी पुढे आली आहे.

पोलीस आयुक्तांकडून दखलदोन दिवसांपासून विविध भागात रस्त्यांवर वाढलेली वाहनधारकांची गर्दी बघून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय चांगलेच नाराज झाले. त्यांनी आज दुपारी शहरातील सर्व अधिकाऱ्यांना कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. वायरलेसवर सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांशी संवाद साधून त्यांनी रस्त्यारस्त्यावर नाकेबंदी कडक करण्याच्या सूचना केल्या. कुणालाही अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यास मुभा देऊ नका, असेही निर्देश दिले. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे अशांना त्यांच्या कामानिमित्त जाऊ द्या, असेही पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाºयांना सांगितले.दुपारी आदेश, सायंकाळी पाहणीदुपारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय आज सायंकाळी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर फिरले. त्यांनी वेगवेगळ्या चौकात आणि मुख्य मार्गावर भेटी देऊन तेथील नाकेबंदी तसेच बंदोबस्ताची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते दिशानिर्देशही दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर