शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 12:47 IST

Nagpur News इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देकेवळ अदखलपात्र गुन्हा दाखलयुवतीच्या कुटुंबीयांनी त्याचा स्क्रीन शॉट घेतल्यामुळे त्याचे बिंग फुटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२८ वर्षाच्या युवतीचे २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नापासून तिचा पती तिला त्रास देत होता. मागील वर्षभरापासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागला. गर्भवती झाल्यानंतर तिच्या पोटातील बाळ आपले नसल्याचे सांगत होता. दरम्यान, त्याने जबरदस्ती पीडितेचा गर्भपात केला. पीडितेच्या तक्रारीनुसार महिनाभरापूर्वी तिला पतीने मारहाण करून रात्री उशिरा घराबाहेर काढले. त्यानंतर ती नंदनवनमध्ये आपल्या बहिणीसोबत राहत आहे.

यापूर्वी सोबत राहत असताना त्याने आपल्या पत्नीची आपत्तीजनक व्हिडीओ क्लिप तयार केली होती. मंगळवारी रात्री एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ अपलोड केला. हे पाहून युवतीचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती युवतीला मिळाल्यानंतर आरोपी पतीने तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून काढून टाकला. परंतु युवतीच्या कुटुंबीयांनी त्याचा स्क्रीन शॉट घेतल्यामुळे त्याचे बिंग फुटले.

पीडित युवतीने नंदनवन पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे आपत्तीजनक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे युवतीच्या पतीविरुद्ध छेडखानी आणि आयटी अ?ॅक्टनुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पती-पत्नीतील वाद आणि न्यायालयात घटस्फोटासाठी प्रकरण असल्याचे सांगून पीडितेला परत पाठविले. यामुळे पीडित युवतीचे कुटुंबीय चिंतेत आहेत...........

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्राम