शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

वादळ, पाऊस, पूर, विजांनी दाेन महिन्यात घेतला २७१ लाेकांचा बळी

By निशांत वानखेडे | Updated: July 21, 2024 18:50 IST

२४ तासात ७ जीव गेले : ३३० जनावरेही मृत्युमुखी :

नागपूर: गेल्या दाेन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने विदर्भासह राज्यभरात थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात वादळी पावसाने ७ लाेकांचे जीव गेले. विशेष म्हणजे १५ मे पासून नैसर्गिक आपत्तीने २७१ लाेकांचे बळी गेले आहेत. यात वादळ, विजा, पाऊस, पूराच्या स्थितीमुळे मृतकांची संख्या ८७ वर आहे. ४८८ लाेक जखमी झाले. या आपत्तीत ३३० जनावरेही मृत्युमुखी पडले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात दाेन महिन्यात विजा काेसळल्याने सर्वाधिक ५२ लाेक मृत्युमुखी पडले तर ५३ जखमी झाले आहेत. पुरामुळे ७ मृत्यु, भिंती किंवा इतर माेठे स्ट्रक्चर काेसळल्याने २२ मृत्युमुखी पडले, तर ५७ लाेक गंभीर जखमी झाले. झाडे काेसळल्यानेही ७ मृत्यु व १७ जखमी झाले. आपत्तीच्या इतर कारणाने १८४ लाेकांनी जीव गमावला आहे, तर ३५७ लाेक जखमी झाल्याची नाेंद आहे.

८७ पैकी छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २० बळी, त्यानंतर पुणे १८, काेंकण १७, अमरावती १६, नागपूर विभाग १२ व नाशिक विभागात ७ लाेकांचा जीव गेला आहे.

अत्याधिक, अति व मुसळधार पावसाने सर्व जिल्हे प्रभावित- (२०४ मि.मी. च्यावर अत्याधिक पाऊस) चंद्रपूर व गडचिराेली हे २ जिल्हे प्रभावित. मात्र २० जुलै राेजी नागपुरात ७ तासात २३२ मि.मी. पाऊस काेसळला, हेही विशेष हाेय.

- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) राज्यातील १० जिल्ह्यांचे २८ तालुके आणि त्यातील ६० मंडळ अति पावसाने प्रभावित आहेत. यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, पालघर, रायगड व काेल्हापूर जिल्हे आहेत.- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा व इतर १६ जिल्ह्यातील ७८ तालुके व २७४ मंडळ.

- येत्या ४८ तासात येलाे अलर्टमध्ये १८ जिल्हे, त्यातील ५८ तालुके व १५१ मंडळ प्रभावित आहेत.- २४ जुलेपर्यंत चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येलाे अलर्ट. २३ जुलैपर्यंत रायगड, २२ जुलैपर्यंत रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अमरावती ऑरेंज अलर्ट, २४ जुलैपर्यंत सातारा व अकाेला येलाे अलर्ट,

राज्यात जूनपासून सरासरी ११९ टक्के पाऊस

जिल्हा सामान्य बरसला टक्के गतवर्षी टक्केनागपूर ३७२.५ ४५८.१ १२२.९८ ९०.७४

भंडारा            ४४८.५ ५१२.१ ११४.१८ ११२.२गाेंदिया ४७३.२ ४६७             ९८.५४ ११०.२

चंद्रपूर            ४२५.५ ५६६.४ १३३.११ १०८.२७गडचिराेली ५००.८ ६५७.६ १३१.३१ १२२.६४

अमरावती ३३३.६            ३००.८ ९०.१७ ७७.६४अकाेला २८८.१ ३३१.८ ११५.१७ ७३.७२

वाशिम ३३१.४ ३७९.७ ११४.५७ ९३.२७यवतमाळ ३३७.८            ४४२.४ १३०.९७ ९७.५७

बुलढाणा २६९.५            ३३२.६ १२३.४१ ९१.०६

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसfloodपूर