नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवालयात भाविक गर्दी करत असल्याचे ध्यानात घेऊन एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी केलेले नियोजन चांगलेच फायद्याचे ठरले आहे. भोले भंडारी महादेवाने महामंडळावर कृपादृष्टी टाकून एसटीच्या तिजोरीत लाखोंची गंगाजळी ओतली आहे.
महाशिवरात्रीचा महाउत्सव देशभर साजरा झाला आहे. ठिकठिकाणच्या शिवालयात भक्तांनी प्रचंड गर्दी करून महादेवाला साकडे घातले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला ठिकठिकाणी भक्तांची मोठी गर्दी होते. हे ध्यानात घेऊन एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आधीच यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन करून ठेवले होते. त्यानुसार मध्य प्रदेशातील पचमढी आणि विदर्भातील अंभोरा, अंबाखोरी, गायमुख या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेत भाविकांना नेण्या, आणण्यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याचा एसटी महामंडळाला घसघशीत लाभ मिळाला. पचमढी यात्रेसाठी एसटीच्या १५० बसेसच्या माध्यमातून भोले भक्तांना सेवा देण्यात आली. त्यातून एसटीला ४८ लाख, ३८ हजार, ८०९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अंभोरा यात्रेतून एसटी महामंडळाने दहा लाख ६१ हजार, अंबाखोरी यात्रेतून एका दिवसात ५३,६४५ रुपये तर गायमुख यात्रेतून एका दिवसात ३१ हजार, १८२ रुपये अर्थात या चार ठिकाणी एसटी महामंडळाने दिलेल्या सेवेच्या बदल्यात एकूण ५९, ८४,६५१ रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
महामंडळाने या चार शिवालयात भरलेल्या यात्रेसाठी किती बसेस, किती फेऱ्या चालविल्या आणि त्यातून किती प्रवाशांनी प्रवास केला. एसटी ला त्यातून किती रुपयाचे उत्पन्न मिळाले, त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.