शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

प्रसार माध्यमांत दलित शब्दाचा वापर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:13 IST

प्रसार माध्यमांद्वारे येणाऱ्या काळात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्दाचा वापर केला जाणार नाही यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. हा आदेश व्यापक सामाजिक बदल घडविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रेस कौन्सिलला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसार माध्यमांद्वारे येणाऱ्या काळात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्दाचा वापर केला जाणार नाही यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. हा आदेश व्यापक सामाजिक बदल घडविणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ‘एस. पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ प्रकरणामध्ये शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच, लता सिंग वि. उत्तर प्रदेश सरकार व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू सरकार प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचेदेखील हेच मत आहे. ‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचक आहे. ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शब्दाचा सर्वत्र वापर करण्यात यावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.----------------केंद्र सरकारने काढली अधिसूचनाही याचिका प्रलंबित असताना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने गेल्या १५ मार्च रोजी अधिसूचना जारी करून, सरकारी दस्तावेजांवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्द वापरण्याला बंदी केली आहे. तसेच, सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ही अधिसूचना उच्च न्यायालयात सादर केली.--------------राज्य सरकारची सकारात्मक भूमिकाराज्य सरकारही अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्द वापरण्याला बंदी करणार आहे. यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून याविषयी येत्या चार आठवड्यांत निर्णय जारी केला जाईल, अशी ग्वाही उच्च न्यायालयाला देण्यात आली. उच्च न्यायालयाने सरकारचे हे वक्तव्य रेकॉर्डवर घेतले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर