शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

नागपूरच्या गांधीसागर तलावातील आत्महत्या थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:19 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या गांधीसागर तलावातील आत्महत्यांना आळा बसावा व अवैध पार्किंग, अस्वच्छतेसह अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या गांधीसागर तलावातील आत्महत्यांना आळा बसावा व अवैध पार्किंग, अस्वच्छतेसह अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.अ‍ॅड. पवन धिमोळे व अ‍ॅड. सारंग निघोट अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी-२००५ ते फेब्रुवारी-२०१८ पर्यंत गांधीसागर तलावामध्ये तब्बल ५६४ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. हा तलाव सुसाईड पॉईन्ट झाला आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे पीडित व्यक्ती सहज तलावापर्यंत पोहचते व पाण्यामध्ये उडी घेऊन जीवन संपवते. या तलावातील आत्महत्यांवर तातडीने आळा बसवणे आवश्यक आहे. त्याकरिता तलावाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत बांधल्या गेली पाहिजे. तसेच, तलाव परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.या याचिकेत गांधीसागर तलावाशी संबंधित इतरही समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. गांधीसागर तलाव परिसरातील अस्वच्छता ही एक गंभीर समस्या आहे. तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरात कचरा फेकणाºयांवर कुणाचेच नियंत्रण नाही. तसेच, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. तलाव अंतर्बाह्य स्वच्छ करणे आवश्यक आहे. तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची अनेक वर्षे जुनी मागणी आहे. परंतु, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. योग्य देखभाल होत नसल्यामुळे तलावाची दूरवस्था झाली आहे.तलावाशेजारच्या रमण विज्ञान केंद्र व टाटा पारशी शाळेपुढे खासगी प्रवास वाहतुकीची वाहने अवैधपणे पार्क केली जातात. पोलीस त्यांच्यावर नियमित कारवाई करीत नाही. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या गर्दीमुळे अपघात होतात. या परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांची नेहमीच रेलचेल असते. परिणामी, अवैध पार्किंगवर कडक कारवाई सुरू करणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेत राज्याचे मुख्य सचिव, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGandhisagar Lakeगांधीसागर तलाव