थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:28 PM2019-07-02T21:28:28+5:302019-07-02T21:29:24+5:30

साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.

Stop ..., do not kill the snake! | थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देसाप निघाल्यास कळवा अन् पर्यावरण वाचवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.
नागपूर शहरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्यात सापांच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या संघटना आणि सर्पमित्रांचेही प्रमाण अधिक आहे. वन्यजीव संरक्षण समिती नागपूर, विदर्भ सर्पमित्र संघटना, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन, नागपूर वाईल्ड लाईफ, हेल्प फॉर अ‍ॅनिमल, हेल्पींग हँड फॉर अ‍ॅनिमल यासारख्या अनेक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात आणि शहरालगतच्या क्षेत्रात सेवा देणारे सर्पमित्र कार्यरत आहेत. साप निघाल्यावर नागरिकांनी संपर्क केल्यावर घटनास्थळी पोहचून सापाला पकडून सुरक्षितपणे मानवी वसाहतीबाहेर सोडण्याचे काम हे पर्यावरणपे्रमी करीत असतात.
पावसाळ्याची सुरुवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थानी पावसाचे पाणी शिरल्यास साप जमिनीबाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात. अशा वेळी सर्पदंशाची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात गम बुट वापरणे, शुज पायात घालताना खबरदारी घेणे, अडगळीच्या ठिकाणी हात घालणे टाळणे, लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाºया पाली आणि बेडकांच्या शोधात येण्याची सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे यासारखी जुजबी खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते. सापांच्या २ हजार ७०० जाती असल्या तरी विदर्भात फक्त नाग, मन्यार, घोणस, फुरसे या चार जातीचे विषारी साप प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे साप न मारता आम्हाला कळवा आणि पर्यावरण वाचवा, असे आवाहन सर्पमित्रांकडून होत आहे.

नागपूर शहर व लगतच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्पमित्र

  • श्रीकांत उके (अजनी) - ९८६००३२१२१
  • विश्वजित उके (सक्करदरा नंदनवन) - ९८९०५२२६६०
  • स्वप्निल बोधाने (बेसा, मनीषनगर ) - ९९२३८९१२३०
  • अनिकेत सुरूशे (हुडकेश्वर)- ९५५२६६६६०५
  • भूषण पुजारी (दिघोरी उमरेड रोड) - ७३५०१७५१३६
  • प्रतीक विद्वंस (पिपला रोड) - ७९७२०८३२३०
  • समीर तुंबडे (मानकापूर, गोधनी) - ९७३०६७७७७५
  • कुणाल जरविया (सिव्हिल लाईन, बर्डी) - ७३८५३२८९८७
  • आशिष मेंढे (म्हाळगीनगर)- ८७९३७८३९८४
  • अंकित खलोडे (वाठोडा खरबी) - ९८३४४४५४३६८
  • सतीश जांगडे (पारडी रोड) - ८७९८६०२७८१
  • अभिषेक देवगिरीकर (नरसाळा) - ७२१८९८१२९२
  • सचिन झोडे (बेलतरोडी घोगली)- ९७६५८५९६८७

असा करावा प्रथमोपचार
सर्पदंश झाल्यावर रुग्णाच्या शरीरातून हृदयाकडे येणारा रक्तप्रवाह थांबवावा. हृदय उंचावर असेल असे झोपवावे. रुग्णाला कडुलिंबाची पाने खायला देऊ नयेत. पायी चालवू नये. हृदयाकडे रक्तप्रवाह होणार नाही अशा पद्धतीने रिबीन अथवा क्रॅप बँडेज बांधावे आणि तात्काळ रुग्णालयात न्यावे.

Web Title: Stop ..., do not kill the snake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.