शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:20 IST

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देजय किसान संघटनेची मागणीहॉलक्रोने गुगल नकाशाद्वारे अहवाल तयार केला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सभापती शीतल उगले यांच्या वक्तव्यानुसार अनधिकृत घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. या कारवाईबाबत बोलताना प्रशांत पवार म्हणाले, या कारवाईमुळे दोन लाख घरमालकांचे आर्थिक नुकसान होऊन १५ लाख नागरिक बेघर होणार आहेत. प्राधिकरणाचा अहवाल सिंगापूरची कंपनी हॉलक्रोने गुगल नकाशाद्वारे तयार केला आहे. हा अहवाल दोषपूर्ण आहे. अहवालात दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे नमूद नाही. अहवालामुळे दोन लाख घरे, ५० हजार कारखाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच १० लाख भुखंड अनधिकृत झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करून ३० कोटी रुपये जमा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गावकऱ्यांना, व्यापाºयांना, कारखानदारांना व भूखंडधारकांना त्रस्त करून त्यांच्याकडून पैसा वसूल करणे हा शासनाचा उद्देश आहे. यात ज्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांनी अनधिकृत बांधकामे केली त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतुद आहे. व्हीसीए स्टेडियमही अनधिकृत असून, या स्टेडियमवर ५ मार्चला होणारा सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पवार म्हणाले, व्हीसीए स्टेडियमची इमारत बेकायदा असून खेळाडू, प्रेक्षकांच्या जीवाशी व्हीसीएचे प्रशासन खेळत आहे. त्यामुळे या स्टेडियमवर कोणताही सामना न घेता पोलिसांनीही अशा सामन्यांना परवानगी देऊ नये. दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला जय जवान, जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, उत्तम सुळके, शेखर शिरभाते, रवींद्र इटकेलवार उपस्थित होते.

टॅग्स :Prashant Pawarप्रशांत पवारnagpurनागपूर