शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा दगडाने ठेचून खून : दोघांना घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:47 IST

किरकोळ वादातून तीन मित्रांमध्ये आधी भांडण आणि नंतर हाणामारी सुरू झाली. त्यातच दोघांनी तिसऱ्याच्या डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळधरा शिवारात बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर  जिल्ह्यातील  पिंपळधरा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (हिंगणा) : किरकोळ वादातून तीन मित्रांमध्ये आधी भांडण आणि नंतर हाणामारी सुरू झाली. त्यातच दोघांनी तिसऱ्याच्या डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळधरा शिवारात बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.पारस रमेश निरंजने (२२, रा. दहेली, जिल्हा चंद्रपूर) असे मृताचे तर योगेश अरुण पातूरकर (२९, रा. हुडकेश्वर, नागपूर) व पंकज गोपाळ पोहनकर (२८, रा. महेंद्री, ता. नरखेड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही मित्र असून, ते कारचालक म्हणून मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीची कान्होलीबारा (ता. हिंगणा) परिसरात कामे सुरू आहेत. पारस आपल्यापेक्षा वरचढ असल्याची भावना योगेश व पंकजच्या मनात निर्माण झाली होती.दोघांनी पारसला बुधवारी रात्री योगेश चालवित असलेल्या एमएच-४०/एच-०२३१ क्रमांकाच्या झायलोने पिंपळधरा शिवारात नेले. तिथे त्याच्याशी वाद घालत दोघांनी मारहाण केली. शिवाय, डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्यांनी पारसचा मृतदेह शेतात टाकून देत पळ काढला. योगेशने पंकजला डोंगरगाव येथे सोडून दिले आणि नंतर तो हुडकेश्वरला गेला.या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सूचनेवरून बुटीबोरी पोलिसांनी लगेच घटनास्थळाचा शोध घेतला. त्यांनी पारसचा मृतदेह ताब्यात घेत संशय आल्याने योगेश व पंकजला पहाटेच्या सुमारात ताब्यात घेतले. त्यानंतर योगेशने या गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळ हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बुटीबोरी पोलिसांनी तपास हस्तांतरीत केला.पारसच्या खुनाची योजना ही पंकजने आखली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. योगेश डोंगरगावहून हुडकेश्वरला निघून गेल्यानंतर पंकजने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दोन अज्ञात व्यक्तींनी आम्हाला वाटेत अडविले आणि पारससोबत त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते दोघेही निघून पळून गेले, अशी खोटी माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून