शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराज बागेतील प्राण्यांना खेळण्यासाठी दगडांचा आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:41 IST

महाराज बागेतील पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांना खेळण्याबागडण्यासाठी या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने मोठाल्या दगडांची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्राणिसंग्रहालयात नवी युक्ती : जेसीबीने पिंजऱ्यापर्यंत पोहचविले दगड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराज बागेतील पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांना खेळण्याबागडण्यासाठी या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने मोठाल्या दगडांची व्यवस्था केली आहे. वन्यजीवांना नैसर्गिक वातावरणाची अनुभूती यावी, यासाठी दगडांचा येथे वापर करण्यात आल्याचे महाराज बाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने म्हणणे आहे.आज दुपारी जेसीबीच्या मदतीने मोठाल्या शिळा येथे आणण्यात आल्या. त्या पिंजऱ्याजवळ आणल्यावर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या आत टाकण्यात आल्या. निसर्गत: वन्यजीव उंचावर बसून टेहळणी करतात. हे लक्षात घेऊन प्राण्यांना या वातावरणाची अनुभूती यावी यासाठी या शिळा येथे रचून ढिगारा करण्यात आला. काही वेळाने पिंजऱ्यातील प्राण्यांनी त्यावर बसून आनंद घेतला. वन्यजीवांच्या पिंजऱ्याला नैसर्गिक रूप देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बिबट, कोल्हा आणि अस्वलांच्या पिंजऱ्यापासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.वन्यप्राण्यांच्या सुविधेसाठी पाऊलमहाराज बाग प्राणिसंग्रहालयाचेप्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर म्हणाले, वन्यप्राण्यांची उंचावर बसण्याची नैसर्गिक वृत्ती लक्षात घेऊन हा प्रयोग केला आहे. वेटरनर ग्राउंडमध्ये मोठाले दगड पडलेले होते. तेच यात उपयोगात आणले आहेत. खासकरून मांजर प्रवर्गातील प्राण्यांसाठी हा अभिनव उपक्रम येथे केला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरwildlifeवन्यजीव