शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मागील वर्षीच्या शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा : विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:07 IST

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही २०१८-१९ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्ता मिळालेला नाही. मागील वर्षीची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महाविद्यालयेदेखील हवालदील झाली आहे. ‘डीबीटी’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ शिष्यवृत्ती कशी जमा होईल, याची विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक महाविद्यालयांची चिंता वाढली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही २०१८-१९ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्ता मिळालेला नाही. मागील वर्षीची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महाविद्यालयेदेखील हवालदील झाली आहे. ‘डीबीटी’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ शिष्यवृत्ती कशी जमा होईल, याची विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे.राज्यातील अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी डीबीटी'(डायरेक्ट फंड ट्रान्सफर) योजना लागू करण्यात आली. मात्र, मागील वर्षी तांत्रिक समस्या आली व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. २०१८-१९ मध्ये ‘डीबीटी’ योजना सुरळीतपणे सुरू झाली. विद्यार्थ्यानी संकेतस्थळावर वेळेवर नोंदणीदेखील केली. परंतु २०१८-१९ च्या शिष्यवृत्तीचा पहिला हफ्ता हा फेब्रुवारी महिन्यात आला. त्यामधील बऱ्याच महाविद्यालयांना अनुदानही मिळाले नाही. शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्तादेखील थकीत आहे. आता महाविद्यालयांत २०१९-२० या सत्रासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षीचीच शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने या वर्षीचा निधी तर आणखी उशिरा मिळेल, अशीच शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कर्मचारी-शिक्षकांच्या वेतनाला फटकागेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती वाटपात सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोळामुळे बऱ्याच महाविद्यालयांवर आर्थिक संकट आले आहे. विशेष म्हणजे अनेकदा तांत्रिक कारण देत, शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालये आर्थिक संकटात आहेत. याचा परिणाम महाविद्यालयात काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरदेखील होत आहे. काही महाविद्यालयांत नियमित वेतन होत नसल्याचे चित्र आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी