शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

By योगेश पांडे | Updated: December 7, 2023 15:00 IST

Devendra Fadnavis : संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

- योगेश पांडे  नागपूर -  राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला व त्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले शेडनेट उडून गेले. या शेडनेटचा कुठलाही विमा नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेडनेटच्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. अगोदरच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासकीय योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेडनेट लावले. मात्र वादळी पावसात ते उडून गेले. शेडनेटचा समावेश कुठलाही विमा योजनेत समावेश नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी शेडनेटसाठी स्वतंत्र विमा योजना तयार करता येईल का यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. शेडनेटची किंमत जास्त असल्याने त्याचा प्रिमियमचा भार सरकार व शेतकऱ्यांना उचलावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन