शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 20:40 IST

महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे

ठळक मुद्देराज्यातील सर्व जि.प.च्या सीईओंना दिले निर्देश : २५१५ हेड व ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या कामाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना पाठविले आहे.राज्यात आतापर्यंत भाजपाचे सरकार होते. आता महाआघाडीने सरकार स्थापन केले आहे. गेल्या सरकारची कुठलेही कामे थांबविण्यात येणार नाही, असे नव्या सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले आहे. असे असताना जिल्हा परिषदेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेले २५१५ हेडवरील, कोकण पर्यटन विकास कार्यक्रम, यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकास या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. परंतु या मंजूर कामापैकी ज्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहे, अशा कामांना शिथिलता दिली आहे. ज्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहे त्या कामांची यादी ग्रामविकास विभागाने तात्काळ मागितली आहे. त्यातही स्पष्ट केले की, वेळेत ज्या कामांचे कार्यारंभ आदेश प्राप्त होणार नाही, ते काम स्थगित झाले असे समजण्यात यावे. नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर घेतलेला हा निर्णय म्हणजे लोक प्रतिनिधींचे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याची ओरड होत आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हेडवरील कामाच्या स्थितीचे अवलोकन केले असता, जिल्ह्यात २५१५ या हेड अंतर्गत २०१९-२० १३.५० कोटीचे २१३ कामे मंजूर करण्यात आली होती. यातील १४० कामांचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला होता. जवळपास ५ कोटीची कामे प्रलंबित होती. तसेच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचे ६ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यातील ५ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र १ काम पाणीपुरवठा विभागाचे असल्यामुळे थांबविण्यात आले होते.नागपूर जिल्हा परिषदेने मंजूर कामाचा कार्यारंभ आदेश जारी केल्यामुळे बहुतांश कामे पूर्णत्वास जाईल. पण अनेक जिल्हा परिषदेत या कामाची काय अवस्था आहे, हे लक्षात घेतल्यास मोठ्या प्रमाणात कामांना स्थगिती मिळणार आहे. जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, कार्यारंभ दिलेल्या कामांची माहिती आम्ही संंबंधित विभागाला पाठविणार आहोत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदfundsनिधी