शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी प्रयत्नरत राहू : राजेंद्र दर्डा

By admin | Updated: December 17, 2015 03:16 IST

लोकमान्य टिळक १९१८ साली यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी ...

नागपूर : लोकमान्य टिळक १९१८ साली यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात समाजमन तयार करण्यासाठी त्यांनी लोकनायक बापूजी अणे यांना एखादे वृत्तपत्र, साप्ताहिक सुरू करण्याची विनंती केली आणि जनतेचे प्रबोधन करण्याचे सुचविले. १९३३ पर्यंत लोकमत हे साप्ताहिक बापूजी अणे यांनी चालविले. त्यानंतर जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी हे साप्ताहिक आणि त्यानंतर अर्ध साप्ताहिक काढले. १९७१ साली त्याचे रुपांतर दैनिकात करण्यात आले. जीव ओतून काम करणाऱ्या आमच्या चमूच्या भरवशावर लोकमत आज वाचकांचे क्रमांक एकचे वृत्तपत्र झाले आहे. यानंतरही भविष्यात सातत्याने परिपूर्ण वृत्तपत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू, असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले. पां. वा. गाडगीळ यांनी सामाजिक-आर्थिक विपुल लेखन केले. परिवर्तनसाठी त्यांनी लेखणी झिजविली. बाबा दळवींनीही शोधप^त्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. लोकांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याची परंपरा लोकमतने सांभाळली आहे. १९४२ च्या आंदोलनात बाबूजी कारागृहात गेले. त्यावेळी कारागृहातून बाहेर पडू, असे वाटलेच नाही, असे मत बाबूजींनी व्यक्त केले होते. त्यांनी लोकांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो, असे राजेंद्र दर्डा म्हणाले. सध्या लोकशाहीत अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. लोकशाहीचे धिंडवडे उडत आहेत. विधिमंडळात गोंधळ वाढतो आहे. शासनाने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे आणि विरोधकांनीही एखाद्या चांगल्या विधेयकाला मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. पण हे घडताना दिसत नाही. त्याशिवाय लोकशाही समृद्ध होणार नाही, असे ते म्हणाले.