शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:59 IST

सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : राज्यभरात ८३३ पदांची भरती

आॅनलाईन लोकमतनागपूर : सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे.ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आली आहे. या पदभरतीत ५ टक्के जागा खेळाडूंकरिता राखीव आहेत. परंतु परीक्षेकरिता आॅनलाईन अर्ज मागवताना क्रीडा प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले नाही. त्यामुळे १ जुलै २०१६ रोजीच्या ‘जीआर’मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून राज्यस्तरीय रस्सीखेचपटू अजितपालसिंग खालसा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापूर्वी त्यांनी या पदभरती प्रक्रियेविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने त्यांना संबंधित अर्ज दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे कारण देऊन अर्ज खारीज केला. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता पुढील आदेशापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई करून शासनाला याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रतीक मेहता व अ‍ॅड. आकाश तिवारी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर