शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुटुंबाच्या भल्यासाठी तंबाखूपासून दूर रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:45 IST

तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर तंबाखू, गुटख्याच्या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे, हे मनोगत विचार रेस्टॉरंटचे मालक व कर्करोग रुग्ण किशोर चितूरकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकर्करोगाच्या रुग्णांचे अनुभव : ‘ओरल कॅन्सर सर्व्हायव्हर्स मीट’

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर तंबाखू, गुटख्याच्या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे, हे मनोगत विचार रेस्टॉरंटचे मालक व कर्करोग रुग्ण किशोर चितूरकर यांनी येथे व्यक्त केले.‘विदर्भ सोसायटी फॉर हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ (व्हीएसएचएनओ), नीती क्लिनिक आणि रोटरी क्लब आॅफ नागपूर दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्यानिमित्ताने आयोजित ‘ओरल कॅन्सर सर्व्हायव्हर्स मीट’मध्ये बोलत होते. हडस हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात कर्करोगावर मात केलेल्या लोकांनी तंबाखू आणि कर्करोगाच्या परिणाम व वर्तमान जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमात ‘व्हीएसएचएनओ’चे अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव आर. रवी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित गोखले, सचिव अमित कुकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजकांची भूमिका डॉ. नीती कापरे, गुप्ता यांनी पार पाडली.चिमूरकर म्हणाले, तंबाखू किती घातक आहे, याची प्रचिती कर्करोग झाल्यावरच आली. स्वत:सोबतच संपूर्ण कुटुंबाला समस्यात ढकलले. मुलाची डॉक्टर होण्याची इच्छा होती, परंतु क्षमता असूनही आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने त्याला इंजिनीअर क्षेत्राकडे वळावे लागले. डॉक्टर आणि कुटुंबाच्या सदस्यांमुळे आता सामान्य जीवन जगत आहे.-युवराज सिंहकडून प्रेरणा मिळालीशिक्षक व समाजसेवक बीना सुरकर म्हणाल्या, कर्करोगाचे निदान झाल्यावर घाबरून गेले. परंतु सासरे आणि मुलाच्या सकारात्मक विचारांमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू युवराज सिंह यांच्याकडू प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे, पूर्णत: बरे झाल्यानंतर शाळेत प्रसाद वाटला तेव्हा शिक्षित लोक प्रसाद घ्यायलाही तयार नव्हते. हे विचित्र आहे. कॅन्सरला ‘कॅन सर्व्हायव्ह’च्या नजरेने पाहिले आणि आज पूर्वीपेक्षा खूप आनंदात आहे.कार्यक्रमाच्या दरम्यान विनायक देशमुख, विठ्ठलराव कुरवाडे, केशव मानकर आदींनीही आलेले अनुभव सांगितले. सर्वांचे एकच म्हणणे होते, कर्करोगाला घाबरू नका, त्याच्याशी लढा.या प्रसंगी अमेरिकन आॅन्कोलॉजीचे डॉ. नीती बोमनवार, डॉ. अजय गुप्ता, डॉ. आर.पी. देशमुख, डॉ. सुधांशु कोठे, डॉ. विदुला कापरे, डॉ. शानू जैन, डॉ. जय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कर्करोगाशी यशस्वी लढा देणाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबाचाही सत्कार करण्यात आला.कर्करोगाला घाबरु नका, त्याला हरवाबँकेची नोकरी करणारे सुरेश तडसे यांना मुखासोबतच थायरॉईडचा कर्करोग असल्याचे निदान झाले. तडसे यांनी सांगितले, कर्करोगामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलो होतो. परंतु पत्नी आणि मित्राने हिंमत दिल्याने दोन वेळा शस्त्रक्रियेला सामोरे गेलो. आज वय ६२ आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह व अन्य समस्या असतानाही चांगले जीवन जगत आहे. कर्करोगाला घाबरू नका त्याला हरवा, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.दर महिन्याला कॅन्सर सर्व्हायव्हर्सची बैठकडॉ. नीती कापरे गुप्ता म्हणाल्या, कर्करोग झाल्याने रुग्णासोबतच त्यांचे पूर्ण कुटुंबही प्रभावित होते. कर्करोगाशी लढून जिंकणारा हा समाजासाठी प्रेरणास्रोत ठरतो. त्यांच्याकडून धडा घ्यायला हवा. दर महिन्याला ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स’ची बैठक आयोजित केली जाईल. यात त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. सोबतच सामान्य लोकांमध्ये कर्करोगाला घेऊन जनजागृतीचे कामही केले जाईल. 

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूर