शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराज्य शासनाची मान्यता : पालकमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत ही मागणी पूर्ण केली आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. बुटीबोरी ग्रामपंचायतीत बुटीबोरी, रेंगापार, बोरखेडी (फाटक) या गावांचा समवेश होता. ग्रामपंचायत बुटीबोरीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. बुटीबोरी ग्रामपंचायतीनेही नगर परिषदेचा दर्जा देण्याचा ठराव पारित केला आहे. तसेच बुटीबोरी शेजारील कृषिदेव कारखान्याच्या भागाचे मतदान बुटीबोरीत असल्याने तो भागही ग्रामपंचायत बुटीबोरी समाविष्ट करण्यास हरकत नाही, असा ठरावही ग्रामपंचायतीत पारित झाला होता.बुटीबोरी ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये रस्ते, वीज, पाणी, नाली, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत बुटीबोरी क्षेत्राला नगर परिषदेचा दर्जा देण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी ३ आॅगस्ट २०१७ च्या पत्रातून केली आहे.जिल्हाधिकाºयांनी केलेली शिफारस लक्षात घेता बुटीबोरी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३ चे पोटकलम (२) (२ क) (३) च्या तरतुदींची पूर्तता होत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता घेऊन शासनाच्या मान्यतेने २९ हजार लोकसंख्या असलेल्या बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बुटीबोरी नगर परिषदेची रचना होईपर्यंत सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहे.पत्रपरिषदेला आ. समीर मेघे, आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे