शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य खड्डेमुक्त करणार - परिणय फुके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:40 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवरील खड्ड्यांचे प्रमाण शासनाच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे.

नागपूर : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवरील खड्ड्यांचे प्रमाण शासनाच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे. येत्या काळात याला आणखी गती देण्यात येईल व राज्याला खड्डेमुक्त करण्यात येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम, वन, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.सबकुछ आॅनलाइनच्या जमान्यात जनतेला खड्ड्यांसंदर्भात थेट मोबाइलवरून तक्रार करता यावी यासाठी ‘अ‍ॅप’ तयार करण्यात येणार आहे. याअंतर्गत तक्रार आल्यावर ४८ तासांच्या आत खड्डे बुजविण्यात येतील, अशी योजना आहे, असे फुके यांनी सांगितले. रस्ते बांधकामात खराब दर्जा खपवून घेतला जाणारनाही. सिमेंट रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यास कारवाई करण्यातयेईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. पुढील तीन महिन्यांत सरकारचेउपक्रम व योजना जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. जर विधानसभा निवडणूकलढायची झालीच तर मी भंडारा गोंदियातून लढवेन. मात्रनिवडणूक लढण्यासंदर्भात सर्व निर्णय पक्षच घेईल, असे फुके यांनी स्पष्ट केले.आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’त आणणारराज्यात विविध आश्रमशाळा, वसतिगृहे, शाळा इत्यादी ठिकाणी राहणाºया व शिकणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या साडेपाच लाखांहून अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विविध सवलती मिळतात. या विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’मध्ये आणण्यात येणार असून त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल. सोबतच या सर्व विद्यार्थ्यांचा विमादेखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती परिणय फुके यांनी दिली.राज्यातील एकाही आश्रमशाळेतील मुलगा खाली झोपणार नाही, खाली बसून शिक्षण घेणार नाही. सर्व ठिकाणी नवीन फर्निचरसाठी निविदी प्रक्रियादेखील राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.‘प्रशासनाला वठणीवर आणणार’प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही. यासंदर्भात फुके यांना विचारणा केली असता प्रशासनाला वठणीवर आणण्यात येईल व कामाचा वेग वाढविण्यावर भर असेल, असे प्रतिपादन केले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र