शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

साताऱ्यातील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अडचणीत : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:08 IST

नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेसह एकूण १२ जिल्हा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अडचणीत सापडली आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेसह एकूण १२ जिल्हा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अडचणीत सापडली आहे.बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने १ मार्च रोजी राज्य संघटनेची संलग्नता स्थगित केली आहे. तसेच, संघटनेचे स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. परिणामी, ही संघटना कोणतीही स्पर्धा आयोजित करू शकत नाही. असे असताना, संघटनेने २ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करून राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर केली आहे. परिपत्रकानुसार, सातारा येथे २ मेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नियमांचा विचार केल्यास या स्पर्धेला काहीच महत्व नाही. राज्य संघटनेची संलग्नता स्थगित असल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेतली जाणार नाही. त्यांना सरकारी योजनांचे फायदे दिले जाणार नाहीत. राज्य संघटनेच्या अवैध कारभारामुळे राज्यातील शेकडो खेळाडूंचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही स्पर्धा महासंघाने स्वत:च्या निरीक्षणाखाली व नियंत्रणाखाली आयोजित करावी, राज्य संघटनेला ही स्पर्धा घेण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व स्पर्धेचे वादग्रस्त परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.राज्य संघटना नोंदणीकृत नाही. यासह विविध गैरव्यवहार आढळून आल्यामुळे महासंघाने राज्य संघटनेला १२ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, संघटनेला समाधानकारक उत्तर सादर करता आले नाही. परिणामी, तिची संलग्नता स्थगित करण्यात आली असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.प्रतिवादींना नोटीसयाचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याच्या क्रीडा विभागाचे सचिव, क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटना, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांना नोटीस बजावून ३० एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, महासंघाने ते ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहे किंवा नाही यावर भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एस. एस. सान्याल व अ‍ॅड. शिबा ठाकूर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBasketballबास्केटबॉलSatara areaसातारा परिसर