शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

राज्यात अवैध ‘टू बाय टू’ स्लीपर बस रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:57 PM

राज्यात ‘टू बाय टू’ स्लीपर लक्झरी बसला परवानगी नाही. मात्र, सुट्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून अशा बसेस सर्रास बेकायदा प्रवासी वाहतूक करीत आहेत. बसमधील गँगवेमध्ये अपुरी जागा, आपात्कालीन दरवाजाची जागाही स्लीपर बेडसाठी व्यापून टाकण्याचे प्रकार वाढल्याने अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा जीव धोक्यात : नियम धाब्यावर बसून धावतात ट्रॅव्हल्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात ‘टू बाय टू’ स्लीपर लक्झरी बसला परवानगी नाही. मात्र, सुट्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून अशा बसेस सर्रास बेकायदा प्रवासी वाहतूक करीत आहेत. बसमधील गँगवेमध्ये अपुरी जागा, आपात्कालीन दरवाजाची जागाही स्लीपर बेडसाठी व्यापून टाकण्याचे प्रकार वाढल्याने अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.राज्यात २०१० मध्ये ‘टू बाय वन’ स्लीपर कोचला परवानगी मिळाली. ‘टू बाय वन’ म्हणजे ड्रायव्हरच्या मागील बाजूस दोन व कंडक्टरच्या मागील बाजूस एक स्लीपर बेड, परंतु पैसे कमावण्याच्या हेतूने अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी ‘टू बाय टू’ स्लीपर कोच तयार केले. म्हणजे ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या बाजूस दोन स्लीपर बर्थ तयार केले. वास्तविक ‘टू बाय टू ’ स्लीपर कोचला अद्याप आरटीओने मंजुरी दिलेली नाही. पण, तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून या बस प्रवाशांना घेऊन धावत आहेत. नागपुरात अशा १५ वर ट्रॅव्हल्स बसेस असल्याची माहिती आहे.आपात्कालीन दरवाजा केला जातो बंदनियमानुसार स्लीपर कोचमधील गँगवेमध्ये सव्वा फूट मोकळी जागा आवश्यक आहे. पण टू बाय टू स्लीपर कोचमुळे गँगवेमध्ये मोकळी जागा शिल्लक राहात नाही. स्लीपर कोचमध्ये आपात्कालीन दरवाजा आवश्यक आहे. पण, जादा स्लीपर बर्थ करण्याच्या हव्यासापायी या दरवाजाची जागा बंद होते. अपघात झाल्यावर प्रवाशांना बाहेर पडण्यास दुसऱ्या दरवाजाचा पर्यायच शिल्लक राहात नाही.केवळ १८ स्लीपर कोचला मान्यताप्राप्त माहितीनुसार, नागपुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ १८ ‘टु बाय वन’ स्लीपर कोचला परवानगी दिली आहे, परंतु ५० च्यावर ‘टु बाय टु’ स्लीपर कोच धावत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बाजूच्या राज्यात ‘टु बाय टु’ ला मंजुरी आहे. ही वाहने नागपुरात येऊन व्यवसाय करीत आहे. यामुळे महाराष्ट्रातही या ‘टु बाय टु’ ला मंजुरी देण्यात यावी, अशी येथील काही ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची मागणी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) या संदर्भात काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र