शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील स्फोटाची राज्य सरकारकडून गंभीर दखल ; संरक्षण, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:42 IST

स्फोट झालाच कसा, गंभीर दखल : वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळी चौकशी

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटाची राज्य सरकारसोबतच संरक्षण मंत्रालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससह वेगवेगळी पथके भंडाराच्या आयुध निर्माणीत धडकली आहेत. हे अधिकारी 'स्फोट झालाच कसा' त्याची चौकशी करीत आहेत. दुसरीकडे पुणे - मुंबईतील फॉरेन्सिकचे पथकही या स्फोटाची चौकशी करीत आहे.

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात आठ तरुणांचे बळी गेले, तर पाच जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. संरक्षण मंत्रालयाने आयुध निर्माणीत सुरक्षेच्या उपाययोजनांची (एसओपी) कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश जारी केले. आयुध निर्माणीत काम सुरू होण्यापासून तो बंद होण्यापर्यंत काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने काम करवून घ्यायचे, त्याबाबत कडक नियमावली दिली असताना भंडाऱ्यात ही घटना घडली. त्यामुळे त्याची संरक्षण मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या तज्ज्ञांचे एक पथक या स्फोटाची चौकशी करण्यासाठी भंडाऱ्यात पोहचले आहे.

एसआयटीची स्वतंत्र चौकशीशीर्षस्थ अधिकारी आणि संबंधितांची पथके एकीकडे स्फोटाची कारणे आणि तीव्रता शोधत असतानाच या घटनेला कोण कारणीभूत आहेत, त्याचा तपास भंडारा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे.

एसओपीचे पालन का झाले नाही?येथे एवढा भीषण स्फोट झाला, म्हणजेच नेमून दिलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे (एसओपी) पालन झाले नाही. त्यासाठी नेमके कोण कोण जबाबदार आहेत, ते तपासण्यासाठी स्फोटके आणि फायरशी संबंधित स्टेट सेफ्टी ऑफीसरच्या नेतृत्त्वातील एक पथक मुंबईहून येथे दाखल झाले आहे.

पथके दाखलसंरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या म्युनिशंस इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच भंडारा येथे दखल झाले आहे. गोळा बारूद, बॉम्ब आणि स्फोटकांच्या तज्ज्ञांचा यात समावेश आहे.

"संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दिल्ली, मुंबई, पुण्यातील वेगवेगळी पथके शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी करीत आहेत. या संबंधाने त्यांची नावे सांगणे योग्य होणार नाही. जखमींना चांगले उपचार देऊन त्यांचे जीव वाचविण्यावर भर दिला जात आहे."- रमेशकुमार यादव, जनसंपर्क अधिकारी, आयुध निर्माणी, भंडारा

 

टॅग्स :bhandara-acभंडारा