शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला १२० कोटींचा निधी

By नरेश डोंगरे | Updated: April 11, 2025 20:17 IST

४४ टक्केचा विषय मार्गस्थ : एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आर्थिक तंगीमुळे पगाराचे वांदे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढल्याने अडचणीत आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने १२० कोटींचा निधी दिला आहे. यातून एसटी महामंडळाने आपला खर्च भागविण्याची सूचनाही शासनाने केली आहे.उल्लेखनीय म्हणजे, एसटीकडे आता प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढल्याने एसटीच्या तिजोरीत चांगली भर पडत आहे. असे असून देखिल एसटीचे ईतर खर्च भागविताना महामंडळाची दमछाक होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वेळोवेळी वांद्ये होत आहेत.

मार्च २०२५ चा पगार देतानाही असेच झाले. एसटी महामंडळाकडे निधीच नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या रकमेपैकी केवळ ५६ टक्केच पगाराचे एसटीने वाटप केले. अंगावर असलेले कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि काैटुंबिक गरजा भागविताना रडकुंडीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला. त्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले. राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये त्या संबंधाने कुरबूर सुरू असल्याचे लक्षात आल्याने महामंडळाकडून राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, आज महाराष्ट्र शासनाने एसटीच्या पदरात १२० कोटींचा निधी घातला. यासंबंधीच्या निर्णयाचे परिपत्रक आज एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाले. परिणामी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.उर्वरित पगाराची व्यवस्था

शासनाकडून ऐनवेळी मिळालेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या उर्वरित पगाराच्या रकमेचे वितरण करण्यासाठी होणार आहे. त्यासाठी विभाग निहाय स्तरावर अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

सुट्यांमुळे वाढली प्रतिक्षा

सरकारने निधीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या पगाराची शिल्लक रक्कम मंगळवार किंवा त्यानंतरच पडू शकेल. कारण शनिवारपासून तो सोमवार पर्यंत सुट्यांमुळे सरकारी कोषागार बंद राहिल. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक असलेला पगार घेण्यासाठी आणखी तीन दिवस प्रतिक्षा करावी लागू शकते. 

टॅग्स :state transportएसटी