शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वैधानिक मंडळाच्या मुदतवाढीचा अधिकार राज्य शासनाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 01:01 IST

वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देणे किंवा न देणे याचा कुठलाही अधिकार राज्य शासनाला नसून तो सर्वस्वी राज्यपालांचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी विकास मंडळामध्ये शासनाचा हस्तक्षेप दूर करून त्याची सूत्रे आपल्या हातात घ्यावी आणि अध्यक्ष व तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक तात्काळ करावी, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य कपिल चांद्रायण यांनी केली आहे.

ठळक मुद्देमाजी सदस्य कपिल चांद्रायण यांचे मत : पुनर्गठन करून अध्यक्षांची नेमणूक राज्यपालांनी करावी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देणे किंवा न देणे याचा कुठलाही अधिकार राज्य शासनाला नसून तो सर्वस्वी राज्यपालांचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी विकास मंडळामध्ये शासनाचा हस्तक्षेप दूर करून त्याची सूत्रे आपल्या हातात घ्यावी आणि अध्यक्ष व तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक तात्काळ करावी, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य कपिल चांद्रायण यांनी केली आहे. कपिल चांद्रायण यांनी राज्यपालांना पत्रव्यवहार करून वैधानिक विकास मंडळाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते राज्यपाल कार्यालयातून मागविलेल्या माहितीनुसार विकास मंडळांना मुदतवाढ देणे किंवा न देणे या प्रक्रियेत राज्य शासनाला अधिकार नसून तसे नियम व कायदेशीर आधार नाही. सरकार जे अधिकार घेऊ पाहते ते केवळ परंपरेमुळे. त्याचप्रमाणे विकास मंडळावर अध्यक्ष किंवा सदस्य नेमणे हाही राज्य शासनाचा अधिकार नाही तर राज्यपालांचा आहे. भारतीय संविधानातील कलम ३७१(२) प्रमाणे विकास मंडळाची स्थापना, संचालन व मुदतवाढ देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यपालांनी राज्य शासनाचा हस्तक्षेप दूर करून विकास मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करावी, अशी मागणी चांद्रायण यांनी पत्राद्वारे केली आहे.विदर्भावर अन्यायचवर्ष २०२० मध्ये मॅग्नेटिक महाराष्टÑ या उद्योग फेअरचे आयोजन करण्यात आले व यामध्ये १६ हजार कोटींचे १२ सामंजस्य करार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यातील एकही उद्योग विदर्भात सुरू झाला नाही. नुकत्याच झालेल्या पुराबाबतही असाच प्रकार दिसला. निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या कोकणाला १२०० कोटीचे पॅकेज देण्यात आले तर पुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भाची १६ कोटी रुपये देऊन बोळवण करण्यात आली. वैद्यकीय प्रवेशात विभागीय आरक्षण रद्द केल्याने विदर्भातील तरुण-तरुणींवर अन्याय होणार आहे.विकास मंडळाची गरजविकास मंडळे म्हणजे राज्यातील अविकसित व मागासलेल्या भागांवर झालेल्या अन्यायाविरोधात शेवटची कायदेशीर व वैधानिक व्यासपीठे आहेत. ती बंद करणे म्हणजे अनैतिक पाऊल होय. विदर्भाचा अनुशेष बाकी नसून केवळ भौतिक अनुशेष शिल्लक असल्याचे म्हणते. मग १९९४ पासूनच्या सिंचन अनुशेषाचे काय झाले, असा सवाल चांद्रायण यांनी उपस्थित केला. प्रादेशिक नियोजन, जिल्हा व प्रदेशाचे विकास आराखडे, अहवाल तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी मंडळावर असते. त्यामुळे ही मंडळे बंद करून प्रदेशाचा आवाज दाबल्या जाण्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळnagpurनागपूर