लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन सभागृहात पर्यटन विकासासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, नितीन राऊत, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.डॅÑगन पॅलेस तसेच दीक्षाभूमी या स्मारक समितीकडून मालकी हक्काबाबतची तसेच १० टक्के निधी बाबतची अट शासनाने शिथील करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली. नागलोक आणि बुध्दभूमीसाठी प्रत्येकी १० कोटी रुपये, कुवारा भिवसेन येथे १५ कोटी रुपये, तसेच दीक्षाभूमी येथील मंजूर झाल्या व्यतिरिक्त उर्वरित कामासाठी २०० कोटी रुपये, ड्रॅगन पॅलेससाठी २०० कोटी रुपये आणि महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थांन कोराडीसाठी अतिरिक्त ६५ कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. शांतिवन, चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाची संपूर्ण कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:04 IST
पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत् आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, रामटेक तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांसंदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून १५ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.
दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथील कामे १५ आॅगस्टपूर्वी सुरू करा
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कोराडी, आदासा, ताजबागचाही आढावा