शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:46 IST

महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.

ठळक मुद्देविना परवानगी रजेवर जाणाऱ्या आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.कोविड-१९ नियंत्रणासाठी उपाययोजना करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. नियोजन नसल्याने कोरोना संसर्ग वाढला. असा आरोप करून सत्तापक्षाने पाच दिवस आयुक्तांना धारेवर धरले. सदस्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता विविध मुद्यावर ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.इंदिरा गांधी रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा प्रश्न नगरसेविका परिणिता फुके यांनी शुक्रवारी पुन्हा सभागृहात उपस्थित केला. डॉ. प्रवीण गंटावर उपस्थित नसतानाही वेतन घेत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. रेकॉर्डला खाडाखोड करण्याचे प्रकार सुरू असल्याने रजिस्टर ताब्यात घेण्याची मागणी केली.महापौरांचे आदेश, आयुक्तांवर नेमस्थायी समितीची परवानगी न घेता रजेवर जाणारे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे.स्थायी समितीची मंजुरी न घेता प्रसार माध्यमांना मुलाखती दिल्या संदर्भात आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे.केटी नगर येथील कोविड केअर सेंटर येथे झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल सादर करा.नव्याने विकसित केलेल्या पाच रुग्णालयाची चौकशी करून स्थायी समिती अध्यक्षांनी अहवाल सादर करावा.काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार परत घेण्याबाबतचा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा.महापौरांनी दिलेले निर्देशउद्यानाप्रणामे नासुप्रचे विभाग हस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात यावी.चेंबर रिपेअरसाठी किती खर्च झाला याची चौकशी करून १५ दिवसात अहवाल द्यावा.नागरिकांना वेठीस धरणारा उपद्रव शोध पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय याला तात्काळ काढा.पथदिव्यांची फाईल रोखणाऱ्या तत्कालीन वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस करावी.व्हिडिओच्या माध्यमातून संत तुकाराम यांचा उल्लेख करून नगरसेवकांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.कोविड-१९ अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन यांचा अहवाल ६ जुलैपर्यंत सादर करा आयुक्तांना निर्देश.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका