शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:12 IST

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले.

ठळक मुद्दे शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केला होता प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले.या ट्रॅकसाठी शासनाने ८ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. विद्यापीठाने जागाही दिली. सामंजस्य करार करून काम सुरु करणे शक्य होते. पण मनपाच्या अधिकााऱ्यांनी यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही. जागा दिल्यानंतर अडचणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सोडवून घेणे अपेक्षित होते. या ट्रॅकचा वापर सकाळी आणि सायंकाळच्या वेळी सुमारे दहा हजार लोक करणार आहेत. लवकरात लवकर या कामातील अडथळे दूर करून काम सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क सुरू करण्यावर चर्चाधरमपेठेतील ट्रॅफिक पार्क हा आतापर्यंत व्यावसायिक दृष्टीने चालला. पण पार्कमधील फूड कोर्ट आणि पार्कि गच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला. त्यात पार्क चालविण्यासाठीच्या परवान्याची मुदत संपली. पार्कि गसाठी कोणतीही जागा येथे उपलब्ध नाही. हा पार्क सुरु करून इच्छुक संस्थेला चालविण्यासाठी देता येऊ शकतो. पार्कच्या मागील बाजूला असलेली विद्यापीठाची जागा पार्किंगसाठी मिळावी असाही सूर काही जणांचा या बैठकीत होता. वाहतूक पोलीस विभागानेही हा पार्क दीड कोटी रुपयांमध्ये चालविण्यास मागितला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. शाळकरी मुलांना वाहतूक नियमांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याची येथे व्यवस्था आहे. मनोरंजनाचा पार्क करायचा असेल तर तो व्यावसायिक दृष्टीने चालवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका