पारशिवनीत काेविड केअर सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:08 AM2021-04-13T04:08:48+5:302021-04-13T04:08:48+5:30

पारशिवनी : शहर व तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पारशिवनी येथे काेविड हाॅस्पिटल नसल्याने रुग्ण गंभीर झाल्यास ...

Start a Kavid Care Center in Parsivani | पारशिवनीत काेविड केअर सेंटर सुरू करा

पारशिवनीत काेविड केअर सेंटर सुरू करा

googlenewsNext

पारशिवनी : शहर व तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पारशिवनी येथे काेविड हाॅस्पिटल नसल्याने रुग्ण गंभीर झाल्यास नागपूर वा इतरत्र हलवावे लागते. तिथे रुग्णांना बेड उपलब्ध हाेत नाही. अशावेळी रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागताे. त्यामुळे शासनाने पारशिवनी येथे काेविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

१११ गावांचा समावेश असलेल्या पारशिवनी तालुक्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. कन्हान शहर वगळता इतर तालुका खेड्यापाड्यात विखुरला आहे. आता ग्रामीण भागातही काेराेना संसर्ग झाला आहे. तालुक्यातील खंडाळा, पारडी, नयाकुंड, मेहंदी, डाेरली, साहाेली, तामसवाडी, इटगाव, हिंगणा, नवेगाव खैरी, बच्चेरा, सुवरधरा, वाघाेडा, बखारी, माहुली, दहेगाव आदी गावात काेराेना रुग्ण आढळत आहेत. काेविड टेस्टिंग सेंटर व शासकीय हाॅस्पिटलमधील कर्मचारीही पाॅझिटिव्ह हाेत आहेत. गंभीर आजारी रुग्णांना नागपूरला हलवावे लागते. त्यामुळे पारशिवनी शहरातील आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे काेविड केअर सेंटर सुरू करावे. जेणेकरून गरजूंना साेईचे हाेईल व रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Start a Kavid Care Center in Parsivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.