शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:04 IST

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनागपूर समितीचा पुढाकार : ७०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरचे उपायुक्त व सदस्य आर. डी. आत्राम यांच्या पुढाकाराने ७०० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, ओबीसी व एसबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल उपायुक्त के. एन. के. राव, सहाय्यक आयुक्त विजय वाकुडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, हंसराज गोहते, गोपाल वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आर.डी. आत्राम म्हणाले की, दरवर्षी नागपूर समितीकडून २० हजाराच्या जवळपास जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यात १२ हजार प्रमाणपत्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे असते. तर पाच हजाराच्या जवळपास अभियांत्रिकीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. तर ३००० च्या जवळपास नोकरी व निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यावर्षी समितीकडे २० ते २२ हजाराच्या जवळपास अर्ज आले आहे. काही प्रकरणात असलेल्या त्रुटी वगळता ८० टक्के प्रमाणपत्राचे काम झाले आहे. सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून आज ७०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी निकालानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता, यावर्षी परीक्षा संपल्यानंतरच प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रnagpurनागपूर