शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सिमतीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 20:36 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित नव्हते.

ठळक मुद्देअध्यक्षांचे नोटीस बजावण्याचे आदेश : बैठकीत तांत्रिक अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांना ‘कारणे द्या’ नोटीस बजावण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी प्रशासनाला दिले.हॉट मिक्स विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्यासह काही विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. यावर झलके यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर होणाºया प्रस्तावाची तांत्रिक तपासणी, सीएसआर अद्ययावत करणे, तसेच शासकीय अनुदानातून सुचविण्यात आलेली कामे करण्यासाठी सेवानिवृत्त उपअभियंता चंद्रकांत गभणे यांची तांत्रिक सल्लागार म्हणून निवड करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनातर्फे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आला होता. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता, हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविला.मंत्री, आयुक्त सभागृहात बैठका घेत असताना स्थायी समितीचीच बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे का? नियम स्थायी समितीलाच लागू होतो का, असा सवाल पिंटू झलके यांनी पत्रकार परिषदेत केला. आयुक्त तुकाराम मुंढे महापालिका मुख्यालयात विविध बैठकी घेत आहेत. या बैठकींना उपस्थित असलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या तुलनेत स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असतानाही समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्याचे झलके यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे समिती सदस्य यांच्यासह उपायुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.स्मार्ट सिटीची वायफाय यंत्रणा अकार्यक्षमस्मार्ट सिटीची वायफाय यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत जबाबदारी या कक्षाकडेच होती. परंतु वाय- फाय यंत्रणा काम करत नव्हती. वारंवार व्यत्यय येत होता. आधी यंत्रणा अद्ययावत करा, त्यानंतरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्थायी समितीच्या बैठका घ्याव्यात, अशी भूमिका पिंटू झलके यांनी मांडली.सर्वसाधारण सभा कशी घेणार?स्थायी समितीच्या बैठकीला ३५ ते ४० पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असतात. समितीची बैठक घेताना तांत्रिक अडचण येत असेल तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दोनशे ते सव्वादोनशे लोक उपस्थित असतात. अशा परिस्थितीत सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कशी घेणार, असा सवाल पिंटू झलके यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर