शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कामगारांना सोडण्यासाठी एसटी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 01:46 IST

लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देबसेसचे निर्जंतुकीकरण : आता केवळ प्रशासनाच्या आदेशाची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून आदेश मिळताच एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.विविध राज्यांतील कामगारांना आपल्या मूळ गावी जाता यावे यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास योग्य असला तरी जवळपास जाणाºया कामगारांसाठी एसटी बसेस उपयुक्त आहेत. अशा कामगारांनी आपली नावे जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहेत. त्यानुसार याद्या तयार करण्याचे आणि कामगारांना सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी प्रशासनाकडून बसेस सोडण्याच्या सूचना येऊ शकतात. यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने शंभराहून अधिक बसेस तयार ठेवल्या आहेत. बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून चालक-वाहकांनाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.हरियाणाच्या विद्यार्थ्यांना सोडले घरीलॉकडाऊनमुळे हरियाणाचे विद्यार्थी पारशिवनीच्या शाळेत अडकून पडले होते. १८ विद्यार्थी, १ शिक्षक यांना एसटी बसने हरियाणाला सोडण्यात आले. ही बस १ मे रोजी पारशिवनी येथून निघाली आणि ४ मे रोजी परत आली. त्यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही एसटी बसने आणण्यात आले होते. बुधवारीही नागपूर रेल्वेस्थानकावर येणाºया कामगारांना एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.कमी दरात देणार सेवाएसटी महामंडळाच्या वतीने ५६ रुपये प्रति किलोमीटर या प्रमाणे प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यात येतात. शासकीय कामासाठी ४४ रुपये प्रति किलोमीटर आकारण्यात येतात. त्यामुळे कामगारांना जाण्यासाठी ४४ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी प्रशासनाने केली आहे. कामगारांना सोडण्यासाठी ३०० ते ३५० बसेसची मागणी होऊ शकते, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Migrationस्थलांतरणstate transportएसटी