शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील एसटी बसमध्ये डिझेल भरायलाही नाहीत पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:02 IST

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला डबघाईचे दिवस आले आहेत. विभागात डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात जवळपास ३० बसेस रद्द करण्याची नामुष्की आगारावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

ठळक मुद्देशेकडो प्रवासी आल्यापावली गेले परत एसटी महामंडळास डबघाईचे दिवस

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला डबघाईचे दिवस आले आहेत. विभागात डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात जवळपास ३० बसेस रद्द करण्याची नामुष्की गणेशपेठ, वर्धमानगर, घाट रोड आणि इमामवाडा आगारावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यामुळे एसटी बसने प्रवास करण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी आल्यापावली परत गेले.एसटीचा प्रवास सुरक्षित असल्यामुळे हजारो प्रवासी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना बुधवारी आणि गुरुवारी त्याचा मोठा फटका बसला आहे. महामंडळाने डिझेलचे पैसेच न भरल्यामुळे इंडियन आॅईल कार्पोरेशनने डिझेलचा पुरवठा केला नाही. परिणामी बुधवारी आणि गुरुवारी मध्यवर्ती गणेशपेठ आगार, वर्धमाननगर आगार, घाट रोड आणि इमामवाडा आगारात बसेसमध्ये भरण्यासाठी डिझेलच उपलब्ध नव्हते. त्यामुळे या चारही आगारातील जवळपास ३० बसेस रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली आहे. यामुळे चंद्रपूरला आणि अमरावतीला जाण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी आल्यापावली परत गेले. इतर मार्गावरील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला. विभागीय कार्यालयातून इंडियन आॅईल कार्पोरेशनमध्ये पैसे भरल्यानंतर डिझेलचे टँकर संबंधित आगारात येऊन डिझेलचा पुरवठा करते. परंतु विभागीय कार्यालयातून पैसेच भरले नसल्यामुळे दोन दिवसांपासून इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या टँकरने डिझेलचा पुरवठा केला नाही. डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात एसटी महामंडळाच्या महसुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.डिझेल संपल्यामुळे अकोल्यात अडकली बसगणेशपेठ आगारात डिझेल नसल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बुधवारी कमी डिझेल भरून रवाना करण्यात आले. परंतु अकोल्यात गेल्यानंतर या बसमधील डिझेल संपले. ही बस अकोला आगारात अडकून पडली. बसमधील प्रवाशांनाही डिझेल नसल्यामुळे गाडीतच बसून रहावे लागले. अखेर अकोला आगाराने या गाडीला डिझेल दिल्यामुळे ही गाडी तासभरानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकही अधिकारी बोलण्यास नाही तयारडिझेल अभावी नागपुरातील चारही डेपोतील बसेस रद्द होत आहेत. परंतु या गंभीर प्रश्नावर एसटी महामंडळाच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कुणीच बोलण्यास तयार नाही. यावरून एसटीचे अधिकारी या विषयावर किती गंभीर आहेत याची प्रचिती आली.

टॅग्स :state transportएसटी