शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बस चढली दुभाजकावर! ४५ प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:19 IST

एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच्या पांजरा फाटा येथे घडला. या बसमध्ये तब्बल ४५ प्रवासी होते.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील पांजरा फाटा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच्या पांजरा फाटा येथे घडला. या बसमध्ये तब्बल ४५ प्रवासी होते. त्यातील काही किरकोळ जखमी झाले.नागपूर येथून एमएच-४०/एन-९३१६ क्रमांकाची आर्वी आगाराची नागपूर - आर्वी ही बस ४५ प्रवाशांना घेऊन कोंढाळीकडे जात होती. बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी होते. ही बस पांजरा फाट्याजवळ येताच मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसला धडक दिली. त्यामुळे क्षणार्धात झालेल्या या प्रकाराने बसचालक गणेश हरिभाऊ गुल्हाणे रा. आर्वी याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता दुभाजकावर चढली. मात्र त्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश आले.बस दुभाजकावर चढताच बसला जबर धक्का बसला. त्यामुळे बसमधील काही प्रवासी हे समोरील सीटवर आदळले. त्यात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजारगाव येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. किरकोळ जखमींना लगेच कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.

टॅग्स :Accidentअपघातstate transportराज्य परीवहन महामंडळ