SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:31 PM2020-07-29T14:31:57+5:302020-07-29T14:32:20+5:30

नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला आहे. २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

SSC Result 2020; Gondia tops Nagpur division, district's overall result is 94.70 percent |  SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के

 SSC Result 2020; नागपूर विभागात गोंदिया अव्वल, जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यात नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला आहे. २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यामध्ये ६ हजार ३७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९६.८६ टक्के मुली तर ९३.६३ मुल उत्तीर्ण झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९२.४४ टक्के एवढा लागला असून तो नागपूर विभागात पाचव्या क्रमांकावर आहे. २९ हजार ८४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यामध्ये ६ हजार १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९४.६१ टक्के मुली तर ९०.४२ मुले उत्तीर्ण झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९४.६३ टक्के इतका लागला आहे. ३८ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यामध्ये १० हजार ६५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वर्धा जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला असून नागपूर विभागात वर्धा जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानी आहे. वर्धा जिल्ह्याचा गेल्यावर्षी केवळ ६५.०५ टक्के निकाल लागला होता. मात्र यावर्षी ९२.१० टक्के निकाल लागल्यामुळे जिल्ह्याने तब्बल २५.१० टक्क्यांची बढत घेतली आहे.
भंडारा जिल्हा नागपूर विभागातून तिसऱ्या स्थानी आहे. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९४.४१ इतकी आहे. यावेळीही निकालात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून १७ हजार ६४४ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५६० विद्यार्थी परिक्षेला बसले. यापैकी १६ हजार ५७८ विद्यार्थी उतीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत ४६१८ तर प्रथम श्रेणीत ७०५७ विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत.

 

Web Title: SSC Result 2020; Gondia tops Nagpur division, district's overall result is 94.70 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.