शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टीचा कन्याकुमारी ते श्रीनगर पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:31 IST

सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले.

ठळक मुद्देमहिला सशक्तीकरणासाठी साहसिक प्रयत्न : लैंगिक समानतेसाठी अभियान

आॅनलाईन लोकमतनागपूर : आज पुरुषांच्या तुलनेत महिला फार मागे आहे. देशाच्या खेड्यापाड्यात महिलांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांचा आवाजाच दाबला गेला आहे. चूल आणि मूल हीच संस्कृती आजही खेड्यांमध्ये बघायला मिळते. देशातील ग्रामीण भागात लैंगिक समानतेची गरज असल्याचे सृष्टी बक्षी म्हणाल्या. सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले.देशभरात महिला सुरक्षेचा असलेला प्रश्न, ‘आय एम चेंज मेकर’, आपल्या हक्काची जाणीव, आर्थिक व संगणक साक्षरता, स्वच्छता, सॅनिटेशन, नेतृत्वक्षमता याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘क्रॉसबो माईल्स’ मोहिमेच्या माध्यमातून सृष्टी बक्षी यांनी पदयात्रा सुरू केली आहे. २६० दिवसात त्या ३८०० किमी पायी प्रवास करून एप्रिलपर्यंत श्रीनगरमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात येत असून महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, यासाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. देशाला महिलांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित बनविण्याच्या वाटचालीसाठी जागृतीचे दमदार पाऊल टाकणार, असा निर्धार सृष्टी बक्षीने पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला. १७००० लोकांशी साधला संवादसृष्टीने आपल्या मोहिमेद्वारे मागील १०३ दिवसात १७ हजार लोकांशी संवाद साधला. यात विद्यार्थी, शिक्षक, जिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य पोलिसांचा समावेश आहे. महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण या दृष्टीने महिला व मुलींसाठी मोहीम फायदेशीर ठरल्याचा विश्वास व्यक्त केला. या दरम्यान अनेक शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वत्र महिलांच्या सारख्या समस्या१५ सप्टेंबर २०१७ रोजी कन्याकुमारी येथून पदयात्रेला सुरुवात झाल्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा होत महाराष्ट्रात दाखल झाल्या. या दरम्यान सर्व ठिकाणी महिलांच्या समस्या काही प्रमाणात सारख्या आढळून आल्यात. त्यात म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव, स्वत:च्या क्षमतेविषयी असणाऱ्या जाणिवेची कमतरता, मुलींसाठी शिक्षणाच्या संधीचा अभाव, हुंडाबळी, दारू आणि कौटुंबिक हिंसाचार आदी समस्या असून त्यावरील उपाययोजनांचा शोध घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्या मांडणार सरकारकडेसृष्टीच्या या अभियानाला गुगल व टाटा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. कार्यशाळेत महिलांनी मांडलेल्या व्यथा, अनुभव त्या आपल्या वेबसाईटवर टाकणार आहे. आलेल्या अनुभवांचा एक सखोल अहवाल तयार करून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते, यासाठी सरकारला अहवाल सादर करणार आहे.

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSportsक्रीडा