शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:25 IST

व्यसनाधिनतेमुळे नैराश्य आल्याने राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) एका जवानाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हिंगणा मार्गावरील राज्य राखीव दलाच्या वसाहतीतील ७९/०१ सहनिवासात हा प्रकार घडला.

ठळक मुद्देव्यसनाधिनतेमुळे नैराश्य : हाताची नस कापून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यसनाधिनतेमुळे नैराश्य आल्याने राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) एका जवानाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हिंगणा मार्गावरील राज्य राखीव दलाच्या वसाहतीतील ७९/०१ सहनिवासात हा प्रकार घडला.विश्वास शामराव मडावी असे जखमी जवानाचे नाव आहे. तो राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक १३ मध्ये कार्यरत आहे. तो व्यसनाधिन झाला असून, त्यामुळे त्याचे कुटुंबीयदेखील त्याला सोडून निघून गेले आहे. तो एकटाच घरी राहतो. कर्तव्यावरही जात नाही. सध्या तो आजारी रजेवर आहे. शुक्रवारी सर्वत्र धुळवड साजरी होत असताना मडावी दिवसभर त्याच्या घरात एकटाच होता. अनेक दिवसांच्या एकाकीपणामुळे त्याला कमालीचे नैराश्य आले होते. तो दुसºयांसोबत फारसा बोलत नव्हता. या अवस्थेत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने धारदार शस्त्राने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजाºयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूची मंडळी जमविली. राज्य राखीव दलाचे वरिष्ठ आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. मडावीला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करून घेण्यात आले. डॉक्टरांनी तो धोक्याबाहेर असल्याचे रात्री स्पष्ट केले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी प्रेमकुमार काशीनाथ मिश्रा यांच्या तक्रारीवरून मडावीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या