शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

नागपूर वाहतूक शाखेच्या कॉल सेंटरला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:43 IST

ट्रॅफिक पोलीस नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, या आणि अशाच स्वरूपाच्या तब्बल ३१ तक्रारी ट्रॅफिक कॉल सेंटरवर दोन दिवसात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देदोन दिवसात ३१ तक्रारीअधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहेब, वाहतूक शाखेचे पोलीस चौकात उभे नाहीत. ते बाजूच्या झाडाखाली उभे आहेत. नमस्कार, येथे रस्त्यावर वाहन उभे आहे. मात्र, ट्रॅफिक पोलीस येथे दिसत नाही. वाहतुकीची कोंडी झाली आहे. येथे बॅरिकेटस आडवे तिडवे लावले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ट्रॅफिक पोलीस नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, या आणि अशाच स्वरूपाच्या तब्बल ३१ तक्रारी ट्रॅफिक कॉल सेंटरवर दोन दिवसात आलेल्या आहेत.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकातील सिग्नलवर तैनाती केली जाते. मात्र, ते चौकाच्या बाजूला आडोशाला उभे राहतात. वाहनचालकाने नियम तोडावे आणि त्याच्याकडून वसुली करता यावी, असा आडोशाला राहणाºया पोलिसांचा हेतू असतो. सिग्नलवर पोलीस उभा दिसला तर कोणताही वाहनचालक नियम तोडण्याची हिंमत दाखवत नाही.मात्र, वाहतूक पोलीस सावज हेरण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसूर करीत असतात. त्यामुळे अपघात होतात अन् नाहक कुणाला जीवघेणी दुखापत होते. यासंबंधाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रस्त्यावरील अपघाताला आळा बसावा आणि रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासंबंधाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना २० मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने तैनातीच्या ठिकाणी गैरहजर राहणाºया किंवा कर्तव्यात कसूर करणाºया वाहतूक पोलिसाची नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षात वाहतूक शाखेच्या पोलिसांसंबंधीच्या तक्रारींसाठी २७ मार्चपासून नवीन कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी १७ तक्रारी आल्या तर आज गुरुवारी दुसºया दिवशी १४ तक्रारी आल्या.

चांगला प्रतिसाद : डीसीपी राजमाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, या नवीन उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १७ तर आज दुसºया दिवशी १४ तक्रारी मिळाल्या. त्याची लगेच दखल घेण्यात आली आणि योग्य ती कारवाई करण्यात आली. या उपक्रमातून गुणात्मक बदलाची अपेक्षा उपराजधानीत एकूण १६१ वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यातील ८७ वाहतूक सिग्नल चौकात वर्दळीच्या वेळेत १५४ पोलीस कर्मचारी नेमले जातात तर, सर्वसाधारण वेळेत १११ कर्मचारी नेमले जातात. वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असा त्यामागचा हेतू आहे. वाहतूक पोलिसांसंदर्भात नागरिकांनी कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही उपायुक्त राजमाने यांनी केले.

तात्काळ पोलीस निरीक्षकांना संदेशनागरिकांनी तक्रार केल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील ट्रॅफिक चॅनलवरून वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षकांना तात्काळ संदेश दिला देतात. संबंधित पोलीस निरीक्षक किंवा त्यांच्या अधिनस्थ अधिकारी तेथे जाऊन संबंधित तक्रारीची शहानिशा करतात आणि योग्य ती कारवाई केली जाते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस