शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचे पैसे बालगृहांवर खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 09:53 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अनधिकृत धार्मिकस्थळांसंदर्भातील प्रकरणात सामाजिक भावना वृद्धींगत करणारा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेशअंमलबजावणीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अनधिकृत धार्मिकस्थळांसंदर्भातील प्रकरणात सामाजिक भावना वृद्धींगत करणारा आदेश दिला. वादातील धार्मिकस्थळांकडून गोळा होणारे पैसे बाल न्याय कायद्यांतर्गत संचालित बाल सुधारगृहे व आश्रयगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आणि तेथील बालकांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींवर खर्च करावेत असे न्यायालयाने सांगितले.या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, सहायक सरकारी वकील अ‍ॅड. कल्याणी देशपांडे व उच्च न्यायालय विधिज्ञ संघटना नागपूरच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांची समिती स्थापन करण्यात आली. हा पैसा विदर्भातील बाल सुधारगृहे व आश्रयगृहांवर खर्च केला जाईल. बाल सुधारगृहे व आश्रयगृहांच्या प्रमुखांना त्यांना आवश्यक असलेल्या बाबींसाठी समितीकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. त्यानंतर समिती प्रस्तावांची पडताळणी करून पुढील कार्यवाही करेल. पैशांच्या वितरणासंदर्भात अटी व शर्ती ठरविण्याचा अधिकार समितीला देण्यात आला. याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, महापालिकेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व अ‍ॅड. सुधीर पुराणिक, नासुप्रतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ तर, मंदिरांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर व इतरांनी बाजू मांडली.

आता ६० हजार भरण्याचा आदेशन्यायालयाच्या आदेशावरून कारवाई करण्यासाठी मनपाने अनधिकृत धार्मिकस्थळांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे १८ जुलैपासून वादातील धार्मिकस्थळांनी १८२७ आक्षेप मनपाकडे दाखल केले आहेत. न्यायालयाने गेल्या २ आॅगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार केवळ २५४ आक्षेपकर्त्या धार्मिकस्थळांनी व्यवस्थापक कार्यालयात ५० हजार जमा केले आहेत. उर्वरित धार्मिकस्थळांनी पैसे भरण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे न्यायालयाने उर्वरित सर्व वादातील धार्मिकस्थळांना आता २१ आॅगस्टपर्यंत प्रत्येकी ६० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. तसेच, प्रकरणावर २३ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. धार्मिकस्थळांनी पैसे भरल्यानंतर त्यांना आक्षेपांवर सुनावणी द्यायची किंवा नाही यावर न्यायालय निर्णय घेणार आहे.

बाल हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगितीकृषी महाविद्यालयाच्या कर्मचारी वसाहत परिसरात असलेल्या बाल हनुमान मंदिरावरील कारवाईवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महापालिका यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. कारवाईविरुद्ध मंदिर समिती व राजेश अंबाडरे यांनी याचिका दाखल केली आहे. हे मंदिर शंभर वर्र्ष जुने आहे. मंदिरामुळे वाहतूक व इतरांना काहीच अडचण नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे २० जुलै २०१८ रोजी मंदिर समितीला नोटीस बजावून मंदिर हटविण्यास सांगितले होते. त्यावर आक्षेप घेऊनही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे समितीने न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय